🕒 1 min read
मुंबई : काही दिवसापुर्वीच बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचे निधन झाले होते. यानंतर बॉलीवूडमधून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध विनोदी अभिनेता चंकी पांडेची आई स्नेहलता पांडे यांचे निधन झाले आहे.
बॉलीवूड अभिनेता चंकी पांडेच्या आई स्नेहलता पांडे यांचे शनीवारी १० जुलै रोजी दुर्दैवी निधन झाले आहे. त्या ८५ वर्षाच्या होत्या. आईच्या निधनाची वार्ता कळताच चंकी पाडे आणि त्याची पत्नी भावना पांडे दोघे वांद्रे येथील त्यांच्या घरी पोहोचले. स्नेहलता पांडे यांच्या निधनाची महिती चंकी पांडेची मुलगी बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन दिली.
https://www.instagram.com/p/CRLXZtvLYfz/
मात्र अद्याप त्यांच्या मृत्युचे खरे कारण समजु शकले नाही. चंकी पांडेचे सांत्वन करण्यासाठी अभिनेता समिर सोनी, अभिनेत्री नीलम त्याच्या घरी पोहोचले. यासह बॉलीवूड दिग्दर्शक साजीद खान यांनी पण चंकी पांडेच्या आईच्या अंतिम संस्काराच्या वेळी हजेरी लावली होती. आईच्या निधनानंतर चंकी पांडेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. १० जुलै शनिवारी मुंबई येथील एका स्मशानभुमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- अन् केंद्राने ट्विटरला आणले वठणीवर ; ट्विटरकडून तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती
- ‘डोळ्यात पाणी आणि गाडीत तेल’ ; इंधन दरवाढीवर केदार शिंदेंचं खोचक ट्विट
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद ; कोरोनाची तिसरी लाट रोखणार कशी?
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

