🕒 1 min read
नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कृत्यांसाठी निधी पुरवण्यात कथितपणे सहभागी असलेल्या 11 सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात आलं आहे. यामध्ये जम्मू काश्मीर पोलीस दलातील आठ पोलीस शिपाई, अनंतनाग येथील दोन शिक्षक आणि हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या संस्थापकाच्या दोन मुलांचाही समावेश आहे.
दहशतवादी संघटनांच्या फुटीरतावादी विचारसरणीत सहभाग घेण, त्याला पाठिंबा देणे आणि प्रचार करणे असे आरोपही या अकरा जणांवर करण्यात आले आहे. त्यामध्ये हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन याच्या दोन मुलांचा त्याचप्रमाणे पोलीस खात्यातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असे शनिवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
ज्या ११ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे ते जम्मू-काश्मीर पोलीस, शिक्षण, कृषी, कौशल्य विकास, ऊर्जा आणि आरोग्य खाते आणि शेर-ए-काश्मीर वैद्यकीय विज्ञान संस्थेतील कर्मचारी आहेत. घटनेच्या अनुच्छेद ३११ नुसार यांना बडतर्फ करण्यात आले असून त्यांच्याकडे या कारवाईविरोधात केवळ उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय आहे.
महत्वाच्या बातम्या :
- बैलगाडीवरुन पडलेल्या काँग्रेस नेत्यांची खिल्ली उडवणाऱ्या भाजपला भाई जगताप यांचं प्रत्युत्तर
- केएल राहुल फिरतोय आथिया शेट्टीच्या भावासोबत ; नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट कमेंट्स
- ‘प्राणी क्रूरता कायद्यानुसार भाई जगतापांवर गुन्हा दाखल करा
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार; शरद पवारांनी दिला चर्चांना पूर्णविराम


