Share

जालना रोडवरील वाहतूक व्यवस्थेत १६ जुलैपर्यंत अंशतः बदल

Published On: 

औरंंगाबाद : जालना रोडवरील अमरप्रित चौक आणि आकाशवाणी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी १० ते १६ जुलै दरम्यान वाहतूक व्यवस्थेत अंशतः बदल करण्यात आले असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

जालना रोडवरील अमरप्रित चौक आणि आकाशवाणी चौकात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसापासून दिसून येत आहे. जालना रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी १० ते १६ जुलैदरम्यान अमरप्रित चौक आणि आकाशवाणी चौकातील सिग्नल सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत बंद राहणार आहेत.

अमरप्रित चौकातून शहानुरमियॉ दर्गाहकडे जाणाऱ्या वाहनधारकांना मोंढा नाका उड्डाणपुलाखालून वळण घेवून यावे लागणार आहे. तर आकाशवाणी चौकातून जवाहरनगरकडे जाणाऱ्या वाहनधारकांना सेव्हनहिल उड्डाणपुलाखालून वळण घेवून यावे लागणार असल्याचे सहाय्यक आयुक्त वानखेडे यांनी कळविले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!