औरंगाबाद : कोरोनाची तीसरी लाट येणार म्हणुन प्रशासन तयारीला लागलेले आहे, मात्र कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणुन प्रशासन नियमांची आमलबजावणी करुन घेतांना उदासीन दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास प्रशासनच जबाबदार आहे, अशा चर्चांना सध्या पैठणमध्ये पेव फुटले आहे.
कोरोनाचा संसर्ग नये म्हणुन जिल्हाधिकारी यांनी शासनादेशाने नागरीक व व्यापार्यांवर निर्बंध लावलेले आहेत. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ अस्थापनांच्या वेळा असतांना देखील या वेळेची अमलबजावनी होतांना दिसत नाही, तसेच दर शनीवार रवीवार संपुर्ण दोन्ही दिवस जीवनावश्यक आस्थापनांना सुट असतांना, शहरातील आईस्कीम पार्लर मिठाईच्या दुकाना तसेच ईतर अस्थापना देखील सुरुच असतात.
तसेच शहर व परीसरातील ढाबे पुर्ण क्षमतेने बसुन तर सर्व्हीस देतातच व रात्री उशीरा पर्यंत सुरुच असतात, या सर्व बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने लोक दुकानात व रस्त्यांवर फिरतांना दिसत आहे. प्रशासनाने नागरीकांकडून नियमांची आमलबजावनी करुन घेतल्यास कोरोनाचा प्रसार होणारच कसा? मुळात आज कोरोना जो फैलावत आहे, त्याला केवळ प्रशासनच जबादार म्हटल्यास गैर होणार नाही. अशी चर्चा नागरिकांकडून होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- रोहित शर्मा सर्वोत्कृष्ट कर्णधार : सूर्यकुमार यादव
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- सूर्यकुमार यादववर नाराज डेव्हिड वॉर्नर ; ट्विट करत म्हणला, ‘मला विश्वास बसत नाहीये’
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- ‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगें’ धोनीसोबत मीही निवृत्ती घेणार, रैनाचं मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
