🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसापासुन श्रीलंका क्रिकेट या ना त्या कारणाने सतत चर्चेत आहे. काही दिवसापुर्वी श्रीलंका संघातील खेळाडू आणि क्रिकेट बोर्ड यांचा वाद चव्हाट्यावर आला होता. भारत विरुद्धच्या सामन्यापूर्वी श्रीलंका क्रिकेटमधून पाच खेळाडूंनी भारताविरुद्धच्या मालिकेसाठी असलेल्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्यानंतर हे खेळाडू कॅम्प देखील सोडून गेले असल्याचे समजले.
यानंतर श्रीलंकेचा कॅप्टन कुशल परेराची हकालपट्टी होणार असल्याचं वृत्त समोर आलं. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ऑल राऊंडर दासून शनाकाला या सीरिजसाठी कॅप्टन करण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेट बोर्डानं घेतला आहे. शनाका हा नव्या करारपद्धतीवर स्वाक्षरी करणारा पहिला खेळाडू होता. गेल्या चार वर्षातील श्रीलंकेचा दासून शनाकाला हा सहावा कॅप्टन असेल. यापूर्वी दिनेश चंदिमल, अँजलो मॅथ्यूज, लसिथ मलिंगा, दिमूथ करुणारत्ने आणि कुशल परेरा यांनी श्रीलंकेचं नेतृत्तव केलं आहे.
Yaar itne to ladke dp nahi badalte jitne SL ne captain badle hai. ???? #SLvIND https://t.co/7dXJnGGwb6
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) July 9, 2021
यावरुन भारताचा माजी क्रिकेटपटु वसिम यांनी श्रीलंका संघ व्यवस्थापनाची आपल्या अंदाजात मजा घेतली आहे. जाफरने आत्तापर्यंतच्या झालेल्या सर्व कर्णधारांचे फोटो शेअर केरत लिहिले, ‘यार इतके तर मुलेही त्यांची डीपी बदलत नाहीत, जितके श्रीलंकाने कर्णधार बदलले आहेत.’ अशा आशयाचे ट्विट करत जाफरने श्रीलंका क्रिकेट बोर्डाची मजा घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- रोहित शर्मा सर्वोत्कृष्ट कर्णधार : सूर्यकुमार यादव
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- सूर्यकुमार यादववर नाराज डेव्हिड वॉर्नर ; ट्विट करत म्हणला, ‘मला विश्वास बसत नाहीये’
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- ‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगें’ धोनीसोबत मीही निवृत्ती घेणार, रैनाचं मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
