🕒 1 min read
पुणे : इंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसने काल शुक्रवारी राज्यातील सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात भर पावसात सायकल यात्रा काढण्यात आली. त्यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना पटोले यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
यावेळी त्यांनी ‘केंद्र सरकारचे अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही, तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे,’ असा टोला लगावला होता. पटोले यांच्या या वक्तव्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू आहेत अशी उपाहासात्मक टीका पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘नाना पटोले हे पप्पू आहेत. केंद्रात जसे एक पप्पू आहेत, तसेच महाराष्ट्रात देखील एक पप्पू आहेत. ते त्यांच्या तोंडाला येईल ते बोलत असतात’. दरम्यान, भाजपचे वरिष्ठ नेते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख पप्पू करत असतात. त्यानंतर आता राज्यात पाटील यांनी पटोलेंना पप्पू म्हटले आहे. यामुळे नवीन राजकीय वाद सुरू होणारे हे मात्र निश्चित.
महत्वाच्या बातम्या
- ‘तोल सांभाळा! नाहीतर महाराष्ट्रातही काँग्रेस अशीच कोसळेल’, ‘त्या’ घटनेवरून भाजपचा सल्ला
- ‘उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाइनचे प्रस्ताव चार टप्प्यांत द्या’, खा.ओमराजेंच्या सूचना
- मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारला टेम्पोची धडक, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
- प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न दिल्याने बीडमध्ये भाजप पदाधिकाऱ्याचा राजीनामा
- काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; नितीन राऊतांची पटोलेंविरुद्ध सोनियांकडे तक्रार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
