बीड : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. काल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे. तरीही त्यांचे समर्थक मात्र पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावरून संताप व्यक्त करत आहेत. प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न दिल्याने भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी पदाचा राजीनामा दिला. मुंडे यांना मंत्रिपद मिळावे ही त्यांची इच्छा नव्हती, तर जिल्ह्यातील अठरापगड जातींची ती इच्छा होती, असे ते म्हणाले.
तांदळे हे १९८९ पासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. तसेच ९ वर्षांपासून ते जिल्हा सरचिटणीस पदावर आहेत. राजीनामा दिल्यानंतर ते म्हणाले की, ‘ज्या काळी भाजपला शेठजी-भटजीचा पक्ष म्हणून हिणवले जात होते तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाला गाव, वस्त्यापासून देशात पोहोचवले. त्यासाठी आज त्यांच्याच वारसांना तोंडात घास आणि मानेत बुक्क्या मारण्याचे पाप भाजपमधील काही पक्षांतर्गत नेते करत आहेत. याच प्रवृत्तीचा निषेध म्हणून मी राजीनामा दिलेला आहे.’
‘भविष्यात नेतृत्व जे निर्णय घेईल त्या निर्णयासोबत आम्ही सामील असणार आहोत. सध्या मी प्राथमिक स्वरूपात हा राजीनामा दिलेला असून भविष्यात मोठे पदाधिकारीदेखील राजीनामा देतील’, असेही तांदळे म्हणाले. दरम्यान, पंकजा यांनी खुलासा करूनही बीड जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांमधून सोशल मीडियावर संतापजनक भावना व्यक्त होत आहेत. भविष्यात याचा फटका भाजपाला बसू शकेल असा अंदाज व्यक्त होतोय.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; नितीन राऊतांची पटोलेंविरुद्ध सोनियांकडे तक्रार
- नितीन गडकरींच्या खासदारकीवर पटोलेंचा आक्षेप, याचिकेवर ६ ऑगस्टपासून सुनावणी
- ‘मागण्या मान्य होत नसतील तर राज्यात पुन्हा आंदोलन सुरू करणार’, संभाजीराजेंचा इशारा
- सामना गमावला तरीही चर्चा भारताच्या ‘सुपरवुमन’ हरलीनची
- संजय राठोड लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार ? शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठं विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

