Share

मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारला टेम्पोची धडक, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Published On: 

हिंगोली : शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड या काल दि. ९ जुलैपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज शनिवारी त्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समिती, कोरोना स्थितीचा आढावा व कृषी विभागाची आढावा बैठक झाली. त्यानंतर सकाळी अकरा वाजता शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा ताफा हिंगोलीच्या रामलिला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाला होता.

यावेळी वर्षा गायकवाड यांच्या वाहनाला एका पिकअप टेम्पोची धडक बसली. ही घटना शहरातील पिपल्स बँकेजवळ घडली. यात पालकमंत्र्यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले. पोलिसांनी टेम्पो चालकास ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, गायकवाड यांचा ताफा शहरातील रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाला होता. त्यांचे वाहन पिपल्स बँकेजवळून जात असताना मोंढ्यातून भरधाव वेगाने पिकअप रस्तावर येत होते. यावेळी गायकवाड यांच्या ताफ्यातील स्कॉटींग व्हॅन पुढे गेल्यानंतर पिकअप चालकाने वाहन रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून पालकमंत्र्यांच्या वाहन चालकाने वाहनाची गती वाढवली.

त्यामुळे वाहन पुढे गेले. पण पिकअपचा या वाहनाला पाठीमागील बाजूस असलेल्या कोपऱ्याला धक्का लागला. यामध्ये वाहनाच्या पाठीमागील बाजूचा भाग थोडा घासल्या गेला. घटनेनंतर पोलिसांनी पीकअप टेम्पो चालकास ताब्यात घेतले असून शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी रामलिला मैदानावर पाहणी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!