Share

‘तोल सांभाळा! नाहीतर महाराष्ट्रातही काँग्रेस अशीच कोसळेल’, ‘त्या’ घटनेवरून भाजपचा सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबई काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा विरोध करण्यासाठी बैलगाडीचा वापर करण्यात आला होता. मात्र, बैलगाडीवर चढणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची संख्या जास्त झाल्याने बैलगाडी तुटली. सुदैवाने या अपघातात कोणालाही ईजा झालेली नाही.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप या आंदोलनात सहभागी झाले होते. भाई जगपात या बैलगाडीवर उभे राहुन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. काँग्रेसचे कार्यकर्ते ‘देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो’ ही घोषणा देत असतांना अचानक बैलगाडी तुटल्याने त्यावरील सर्व नेते खाली कोसळले. यावरून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसला टोला लगावत खोचक सल्ला दिला आहे.

‘तोल सांभाळा भाई जगताप. महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळतात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा’, असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर भाई जगताप यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यात भाई जगताप आणि काँग्रेस कार्यकर्ते बालंबाल बचावले आहेत. कोणालाही ईजा झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने करण्यात येत असलेल्या आंदोलनाचे मात्र, चांगलेच हसू झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!