Share

‘दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्या’, आ.दानवेंची ठाकरे सरकारकडे मागणी

Published On: 

🕒 1 min read

जालना : जालना जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे. त्यामुळे भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. पेरणी वाया गेलेल्या शेताचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांची राज्य सरकारकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगामाला सुरुवात होऊन शेतकऱ्यांनी कपाशी, मिरची, सोयाबीन, तुर, वडीद, मुंग, ज्वारी व बाजरी या सारख्या पिकांच्या मोठया प्रमाणावर पेरण्या केल्या होत्या. पिके उगवुन आल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे उगवलेली पिके जळालीत. त्यामुळे भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे.

यावर्षी अगोदरच सोयाबीन व मका पिकाच्या बियाण्यांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पदरमोड करुन पेरण्या केल्या आहेत. त्यातच डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे शेतीची मशागत करण्याच्या खर्चातही मोठया प्रमाणावर वाढ झालेली आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा घेवुन मोठ्या आशेने खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. परंतु पावसाने मोठा खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांची पिके हातची गेली असुन दुबार पेरणी करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही.

राष्ट्रीयकृत बॅंकांकडुन शेतकऱ्यांना विहीत मुदतीत पिक कर्ज मिळत नाहीये. तसेच कोरोना, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेय. त्यातच आता दुबार पेरणीचे संकट निर्माण झालेय. त्यामुळे या सर्व परिस्थतीचा विचार करुन दुबार पेरणी व नुकसान भरपाई पोटी हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान जाहीर करावे अशी मागणी आ. दानवे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!