🕒 1 min read
मुंबई : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार होता. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला आहे. तर, दिग्गज मंत्र्यांकडून कार्यभार काढून घेत त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.
दरम्यान, भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांचा मोदींच्या कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आलाय. इतकंच नाही तर राणेंचा मंत्रिपदाचा शपथ घेण्याचा पहिला मान देखील देण्यात आला. नारायण राणेंना मोदींच्या मंत्रिमंडळात सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. यावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत नारायण राणे चांगल काम करतील अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
‘राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. पण त्यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. तरीही आमच्या राणेंना शुभेच्छा आहेत. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी’, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान, अनेक जुन्या जाणत्या नेत्यांना बाजूला ठेवून मोदी सरकारने नव्या चेहऱ्यांना जबाबदारी दिली आहे. अर्थात त्यांची क्षमता पाहूनच त्यांना जबाबदारी दिली आहे. या मंत्र्यांनी आता महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं. मधल्या काळात लहान उद्योग मरून पडला होता. त्याला संजीवनी देण्याचं आव्हान राणेंसमोर आहे. रोजगार निर्मितीचं काम त्यांच्या पुढे आहे. हा व्यक्तिगत टीका टिप्पणीचा विषय नाही. राणे चांगले काम करतील. ते महाराष्ट्रात उद्योग आणतील असा विश्वास आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- आजारी असतानाही एकनाथ खडसे ईडीच्या चौकशीसाठी हजर
- “दिलीप कुमार यांच्या घरी जायला वेळ आहे, पण स्वप्निल लोणकरच्या आईला भेटायला नाही”
- अमित शाहांकडे सहकार खाते गेल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची शक्यता
- ‘कोण कुणाला अंगावर घेतं ते बघाच’, राणेंना मंत्रिपद मिळाल्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया
- श्रीलंका मालिकेपूर्वी हार्दिक करतोय गोलंदाजीचा सराव, पण…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
