मुंबई : पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर खडसे यांनादेखील समन्स बजावण्यात आलेलं असून, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी खडसे पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर ते चौकशीला हजर राहणार की नाही याबाबत शंका होती. पण ते आज ईडी कार्यालयात चौकशीला हजर झाल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांची आज ( दि. ८ जुलै २०२१ ) होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. आज, ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिलेत. काल बुधवारी त्यांना ईडीनं समन्स बजावले होते. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ‘ईडी’ने बुधवारी सकाळी अटक केली. विशेष न्यायालयाने त्यांना येत्या १२ पर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण?
पुणे शहरालगत भोसरी एमआयडीसीत ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाताई व जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी करण्यात आली. या व्यवहारात खडसेंनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप होता, तर एमआयडीसीची जमीन खरेदी करता येत नाही, शिवाय कोट्यवधींची जमीन कवडीमोल दरात खरेदी करण्यात मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार, फिर्यादही याप्रकरणी नोंदविण्यात आली होती. भोसरी येथील जमिनीची किंमत सुमारे ४० कोटी रुपये असताना ती केवळ ३.७५ कोटी रुपयांना खडसे यांच्या कुटुंबीयांना विकण्यात आल्याचा आरोप केला होता. न्या. झोटिंग समितीने या प्रकरणाची चौकशी केली, सोबतच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशी करून खडसेंना क्लीन चीट दिली होती. झोटिंग समितीचा अहवाल खडसेंनी वारंवार मागणी करूनही जाहीर झाला नव्हता.
महत्वाच्या बातम्या
- भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का ; ‘या’ स्टार खेळाडूची माघार
- …अन् आबांनी कपिल पाटलांबाबत वर्तवलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली !
- भाऊ कदमला भेटला त्याचा जबरा फॅन, चाहत्याचे प्रेम पाहून गेला भारावून
- …अन् नारायण राणेंना मिळाला पहिला मान ; घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
- शहर वासियांना आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करा, मनसेची मनपा आयुक्तांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
