Share

अमित शाहांकडे सहकार खाते गेल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Published On: 

नवी दिल्ली : मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांनी बुधवारी सायंकाळी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. आता विविध खात्यांची जबाबदारी मंत्र्यांना देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विज्ञान, तंत्रज्ञान विभाग देण्यात आले आहे. अमित शाह यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  शाह यांच्याकडे देण्यात आलेल्या नव्या जबाबदारीमुळे महाराष्ट्रात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता पाहायला मिळू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, अमित शाह यांच्याकडे हे मंत्रीपद गेल्याने राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील सहकार क्षेत्रामध्ये राष्ट्रवादीचा दबदबा आहे. अशाच अमित शाह यांच्याकडे सहकार खात्याचा कार्यभार देण्यात आल्याने राज्यातील सहकार चळवळीत मक्तेदारी असलेल्या राष्ट्रवादीच्या अडचणी वाढतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या तीन प्रमुख राज्यांमध्ये सहकारी चळवळींचा फार मोठा राजकीय प्रभाव आहे. या तीनपैकी केवळ महाराष्ट्रात भाजपाची सत्ता नाही. भाजपासाठी ही तिन्ही राज्ये फार महत्वाची असल्याने या नवीन खात्याच्या माध्यमातून सध्या सत्ता नसणाऱ्या महाराष्ट्रावरील राजकीय पकड अप्रत्यक्षपणे अधिक घट्ट करण्याचा भाजपाचा विचार आहे.

राष्ट्रवादी – काँग्रेसच्या अनेक नेत्यांचं राजकारण सहकाराच्या माध्यमातून चालतं. आता मोदींनी सहकार मंत्रालयाची जबाबदारी अमित शहांकडे सोपवली आहे. त्यामुळे येत्या काही काँग्रेसचे महत्त्वाचे नेते अडचणीत येऊ शकतात. महत्त्वाचे निर्णय अतिशय ठामपणे घेण्याचं कसब शहांकडे आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील अत्यंत चाणाक्ष मंत्री अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आल्यानं येत्या काही दिवसांत सहकार क्षेत्रात मोठ्या घडामोडी पाहायला मिळू शकतात.

सहकार चळवळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा वाटा राहिलेला आहे. सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, दूध संघ राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ताब्यात होते. म्हणजेच सहकार चळवळीत नेहमीच राष्ट्रवादीचे नेते अग्रभागी राहिलेत. परंतु आता अमित शहा यांच्याकडे सहकार खातं गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची जी सहकार क्षेत्रातील इनव्हॉलमेंट आहे, ती आता मोडीत निघणार अशा चर्चाही आता रंगू लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!