🕒 1 min read
श्रीलंका : शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ सोमवारी श्रीलंकेत दाखल झाला. श्रीलंकेत टीम इंडिया तीन एकदिवसीय सामने आणि तब्बल टी -20 सामने खेळणार आहे. या दौर्याची सुरुवात वनडे मालिकेपासून होईल. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी, दुसरा 16 रोजी आणि तिसरा वनडे 18 रोजी खेळला जाईल. भारताचे प्रमुख खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये असल्याने या दौऱ्यासाठी नवख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला असून २९ जून ते १ जुलै पर्यंतचा आपला क्वारंटाईन कालावधीत पूर्ण करून सर्व खेळाडू आता एकत्र आले आहेत. ५ जुलैपासून भारतीय संघाने एकत्र सराव करण्यास सुरुवात केली, भारतीय संघाचे श्रीलंकेतील पहिले सराव सत्र शुक्रवारी पार पडले. भारताचे खेळाडू सोमवारी श्रीलंकेत दाखल झाले होते. दाखल झाल्यानंतर त्यांना पुढील तीन दिवस क्वारंटाईन राहावे लागले होते. परंतु, आता त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी संपला असून भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली आहे.
या मालिकेपूर्वी भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने टीम इंडियाच्या सध्या सुरु असलेल्या तयारी आणि त्यापुढील योजनांबद्दल माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने अष्टपैलू हार्दिक पांड्या संबंधित अतिशय महत्वाची माहिती शेअर केली आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे हार्दिक बऱ्याच वर्षांपासून गोलंदाजी करत नाही आणि तो सातत्याने गोलंदाजी करू शकत नसल्याने बरेच प्रश्न निर्माण झाले आहे. याविषयी सूर्यकुमारला विचारण्यात आले.
त्यावर सूर्यकुमार म्हणाला, तो आगामी खेळात गोलंदाजी करताना दिसू शकतो. सराव सामन्यादरम्यान त्याने नेटमध्ये गोलंदाजी केली तसेच नेट्समध्ये गोलंदाजी करत आहे आणि इंट्रा-स्क्वॉड सामन्यातही त्याने गोलंदाजी केली. परंतु हार्दिक आगामी सामन्यात गोलंदाजी करेल कि नाही हा त्याच्या आणि संघ व्यवस्थापनाचा निर्णय आहे. पण, तो गोलंदाजी करत आहे आणि ही चांगली बाब आहे, यादवने व्हर्च्युअल संवाद दरम्यान माध्यमांना सांगितले.
तसेच यादव पुढे म्हणाला, “पांड्याने इंग्लंड मालिकेत गोलंदाजी केली. ‘इंडियन प्रीमियर लीग’ (आयपीएल) दरम्यान त्याने गोलंदाजी केली नाही कारण तो टीम मॅनेजमेंट आणि हार्दिकचा निर्णय होता.
महत्वाच्या बातम्या
- भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का ; ‘या’ स्टार खेळाडूची माघार
- …अन् आबांनी कपिल पाटलांबाबत वर्तवलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली !
- भाऊ कदमला भेटला त्याचा जबरा फॅन, चाहत्याचे प्रेम पाहून गेला भारावून
- …अन् नारायण राणेंना मिळाला पहिला मान ; घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
- शहर वासियांना आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करा, मनसेची मनपा आयुक्तांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
