🕒 1 min read
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचं पाहायला मिळालं. दोन दिवसांच्या अधिवेशनात देखील अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत असून काही काळ सभागृहाचे कामकाज देखील तहकूब करण्यात आले होते. तर, या गोंधळानंतर असंसदीय शब्द वापरत धक्काबुक्की केल्याचा आरोप करत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी १२ आमदारांच्या निलंबनाला मान्यता दिली.
पुन्हा कामकाज सुरु झाल्यानंतर, ‘ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना काही सदस्यांनी आज सभागृहात गदारोळ केला. विरोधी सदस्य विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घुसले त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. गावगुंडाप्रमाणे हे सदस्य वागत होते, असं सांगतानाच संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. माझ्यासाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतिला हे शोभणारं नाही. महाराष्ट्रात असं कधीच घडलं नव्हतं,’ असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.
भास्कर जाधव यांच्या आरोपांना भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘या भास्करला खोटं बोलायची सवय आहे, याच्या गावात मंदिराच्या कार्यक्रमांमध्ये याला बोलावलं नाही म्हणून स्वतःच्या गावात गावकऱ्यांना आई बहिणीच्या शिव्या दिल्या व अंगावर गेला. भास्कर टपोऱ्या सारखा कोणाची ही कळ काढत बसतो म्हणून शिव्या दिल्या असतील, सवय आहे त्याला.’ असा सणसणीत टोला निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना लगावला आहे.
या भास्करला खोटं बोलायची सवय आहे, याच्या गावात मंदिराच्या कार्यक्रमांमध्ये याला बोलावलं नाही म्हणून स्वतःच्या गावात गावकऱ्यांना आई बहिणीच्या शिव्या दिल्या व अंगावर गेला. भास्कर टपोऱ्या सारखा कोणाची ही कळ काढत बसतो म्हणून शिव्या दिल्या असतील, सवय आहे त्याला. https://t.co/lm9PrnIcV8
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 5, 2021
भाजपच्या डझनभर आमदारांचे निलंबन
याच पार्श्वभूमीवर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी भाजपच्या १२ आमदारांवर कारवाई म्हणून १ वर्षासाठी निलंबित करण्याचा ठराव मांडला होता. हा ठराव आवाजी मतदानाने सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. या निलंबनानंतर भाजप नेते कामकाजावर बहिष्कार टाकत सभागृहातून बाहेर आले. गिरीश महाजन, आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत, किर्तीकुमार बागडीया या आमदारांचा समावेश आहे. या आमदारांना पुढील एक वर्षासाठी विधानसभेच्या मुंबई किंवा नागपूरच्या एकाही कामकाज सहभाग घेता येणार नाही.
नेमका गोंधळ काय ?
ओबीसी आरक्षणासाठीच्या इम्पिरीकल डाटा केंद्राकडून मिळावा यासंदर्भात एक प्रस्ताव आज मंत्री छगन भुजबळ यांनी मांडल्यानंतर तो सभागृहात मंजूर करण्यात आला. मात्र, हा ठराव मांडण्यात आल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अध्यक्षांचा माईकही ओढला. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. तर, तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केल्याचा आरोप देखील ठेवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘हिंदू-मुस्लिम वेगवेगळे नाहीत, सर्वांचा डीएनए एकच’, मोहन भागवत यांचे वक्तव्य
- ‘इम्पेरिकल डेटा केवळ राज्य सरकार गोळा करू शकते, ठराव फक्त दिशाभूल करण्यासाठी’
- ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डेटा देण्यासाठीचा ठराव विधानसभेत मंजूर
- भाजपच्या आमदारांचं निलंबन : ‘आम्ही शिवीगाळ केलीच नाही, राज्य सरकारचं हे षडयंत्र’; फडणवीस कडाडले
- ‘अनिल देशमुख देखील असेच मधात बोलत होते, आता ते आत जाताहेत’, मुनगंटीवारांचे सभागृहात वादग्रस्त वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
