🕒 1 min read
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचं पाहायला मिळालं. दोन दिवसांच्या अधिवेशनात देखील अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत असून काही काळ सभागृहाचे कामकाज देखील तहकूब करण्यात आले होते. तर, या गोंधळानंतर असंसदीय शब्द वापरत धक्काबुक्की केल्याचा आरोप करत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी १२ आमदारांच्या निलंबनाला मान्यता दिली.
दरम्यान, १२ आमदारांच्या निलंबनानंतर भाजपच्या विविध नेत्यांनी याचा निषेध केला आहे. तर, भाजप नेते शिवराय कुलकर्णी यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ओबीसी समाजाचं इम्पिरीकल डाटा केंद्राकडून मिळावा यासंदर्भात एक प्रस्ताव मांडताना केंद्र सरकार आणि फडणवीस सरकारवर खापर फोडलं होतं. याला भाजपने तीव्र विरोध केला होता.
याबाबत शिवराय कुलकर्णी यांनी ट्विट करत छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. ‘भास्कर जाधव नामक दलबदलु नेत्याने आज विधानसभा अध्यक्ष पदाची खुर्ची कलंकित केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा बहुरूपी सांता क्लॉज मोदींवर खोटे आरोप करत होता, त्याला टोकाचा विरोध करणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन. महाविकास आघाडीच्या पापाचा घडा भरला. जाहीर निषेध,’ असं शिवराय कुलकर्णी म्हटले आहेत.
भास्कर जाधव नामक दलबदलु नेत्याने आज विधानसभा अध्यक्ष पदाची खुर्ची कलंकित केली. राकाँ चा बहुरूपी सांता क्लॉज मोदींवर खोटे आरोप करत होता, त्याला टोकाचा विरोध करणाऱ्या @BJP4Maharashtra च्या 12 आमदारांचे निलंबन. #MVA च्या पापाचा घडा भरला. जाहीर निषेध !@Dev_Fadnavis @ChDadaPatil
— Shivaray Kulkarni ( मोदी का परिवार ) (@ShivarayK) July 5, 2021
नेमका गोंधळ काय ?
ओबीसी आरक्षणासाठीच्या इम्पिरीकल डाटा केंद्राकडून मिळावा यासंदर्भात एक प्रस्ताव आज मंत्री छगन भुजबळ यांनी मांडल्यानंतर तो सभागृहात मंजूर करण्यात आला. मात्र, हा ठराव मांडण्यात आल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अध्यक्षांचा माईकही ओढला. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. तर, तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केल्याचा आरोप देखील ठेवण्यात आला आहे.
भाजपच्या डझनभर आमदारांचे निलंबन –
याच पार्श्वभूमीवर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी भाजपच्या १२ आमदारांवर कारवाई म्हणून १ वर्षासाठी निलंबित करण्याचा ठराव मांडला होता. हा ठराव आवाजी मतदानाने सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. या निलंबनानंतर भाजप नेते कामकाजावर बहिष्कार टाकत सभागृहातून बाहेर आले. गिरीश महाजन, आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत, किर्तीकुमार बागडीया या आमदारांचा समावेश आहे. या आमदारांना पुढील एक वर्षासाठी विधानसभेच्या मुंबई किंवा नागपूरच्या एकाही कामकाज सहभाग घेता येणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसी म्हणाले, ‘ही तर हिंदुत्त्वाचीच देण’
- ओबीसी आरक्षणासाठी १२ काय १०६ आमदार पणाला लावू; देवेंद्र फडणवीसांची गर्जना
- ‘मराठा समाजाच्या प्रश्नांवर वादविवाद नकाे’, संभाजीराजेंचे आवाहन
- भीमा कोरेगाव जातीय हिंसाचार प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांचे निधन
- ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डेटा देण्यासाठीचा ठराव विधानसभेत मंजूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
