अकाेला : कोरोनामुळे राज्य विधिमंडळाचे दाेन दिवसांचे पावसाळी अधिवेशन आहे. मात्र, मराठा समाजाचे प्रश्न दाेन नव्हे, तर एका तासातही निकाली निघू शकतात. परंतु वादविवाद नकाे, त्याऐवजी आता पर्यायावर चर्चा हाेणे आवश्यक आहे. मराठा समाजाला न्याय कसा देता येईल, यावरच चर्चा हाेणे अपेक्षित आहे, असे संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजे यांचा मराठा समाज जनसंपर्क दौरा रविवारी पार पडाला. समाजाला संबाेधित केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आता न्यायालयाच्या निर्णयानंतर सामाजिक मागास राहिलाे नाही. मागास आहाेत, हे सिद्ध करायचे असल्यास मागासवर्गीय आयाेग गठीत करावा लागणार आहे. यापूर्वीच्या गायकवाड आयाेगाच्या अहवालातील त्रुटी दूर करून पुढील कार्यवाही करावी लागेल.
पदासाठी आंदोलन नकाे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते करतात. यावर संभाजीराजे यांनी प्रत्युत्तर दिले. काेण काय बाेलताे, यावर मी बाेलणार नाही. संभाजीराजे समाजाचा सेेवक आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज घराण्याचा वंशज आहे. मी प्रामाणिकपणे काम करत असून, समाजाचा माझ्यावर विश्वास आहे. फसवणूक करणे हे माझ्या रक्तात नाही. मी पदासाठी काम करत नाही. मी मराठा समाजाचा सेवक असून, बहुजन समाजाचे नेतृत्व करताे, असेही ते म्हणाले
महत्वाच्या बातम्या
- ‘इम्पेरिकल डेटा केवळ राज्य सरकार गोळा करू शकते, ठराव फक्त दिशाभूल करण्यासाठी’
- ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डेटा देण्यासाठीचा ठराव विधानसभेत मंजूर
- ‘पळून जायला मी काय मोदी आहे का?’, शिवसेना आ.प्रताप सरनाईकांनी आरोप फेटाळले
- ‘अनिल देशमुख देखील असेच मधात बोलत होते, आता ते आत जाताहेत’, मुनगंटीवारांचे सभागृहात वादग्रस्त वक्तव्य
- मोठी बातमी! ‘एमपीएससीची सर्व रिक्त पदे ३१ जुलैपर्यंत भरणार’, अजित पवारांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
