🕒 1 min read
मुंबई : डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर क्रिकेट रसिकांचे लक्ष हे आगामी इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेकडे लागले आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये सुट्ट्याचा आनंद घेत आहे. लवकरच संघाचे खेळाडु विलगीकरणात येतील.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज माजी खेळाडु इयान चॅपेल यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी ते म्हणाले,’सध्याचा भारतीय संघ हा गोलंदाजी स्तराच्या सर्वोत्कृष्ट संघाच्या यादीत पोहोचला आहे. याच गोलंदाजाच्या कामगीरीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमित नमवले होते. त्यामुळे भारतीय संघात इंग्लंडला त्यांच्या भूमित नमवण्याची क्षमता आहे. त्यांची चांगली गोलंदाजी त्यांना विजय मिळवुन देईल.’ असे इयान चॅपेल म्हणाले.
यावेळी त्यांनी न्युझीलंडच्या गोलंदाजी आक्रमणाची तुलना ही १९७०-१९८०च्या दशकातील वेस्ट इंडिज गोलंदाजी आक्रमणाशी केली आहे. टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट, नील वॅगनर आणि कायली जेमीसन या गोलंदाजी आक्रमणाने डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला पराभूत केले. येत्या ५ ऑगस्टपासुन भारत आणि इंग्लंड संघादरम्यान कसोटी मालिका सुरु होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- अतीउत्साह नडला अंगी! ‘त्या’ वक्तव्यामुळे कार्तिकला मागावी लागली माफी
- डेल्टा प्लस चा जिल्ह्यात एकही रुग्ण नसताना बाजारपेठेवर वेळेचा निर्बंध का?? जिल्हा व्यापारी महासंघाचा आक्षेप
- ‘केंद्राचा कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा, आम्ही दुसरा आणणार’
- ‘स्वप्निलची आत्महत्या नव्हे, हा तर ठाकरे सरकारने केलेला मर्डर आहे!’
- ‘..अन्यथा हेच तरूण तुमच्या गळ्याला फास लावतील’, राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
