Share

मराठा आक्रोश मोर्चा : ‘आता तारीख देणार नाही, थेट ऍटॅक करू’; नरेंद्र पाटलांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवला. शिवाय आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाचा या निकालानंतर मराठा समाज हा तीव्र नाराज झाला असून राज्यभरात विविध आंदोलने आणि मोर्चे काढले जात आहेत.

दरम्यान, कोरोना काळात मराठा समाजाने संयम बाळगण्याचं आवाहन राज्य सरकारतर्फे केलं जात असलं तरी विविध मराठा संघटना, पक्ष हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. आज सोलापुरातील आक्रोश आंदोलनात देखील पोलिस आणि नेत्यांमध्ये काहीसा संघर्ष पाहायला मिळाला. सोलापुरातील आक्रोश मोर्चास येणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि आंदोलकांना सोलापूर शहराबाहेरच पोलिसांनी रोखले होते.

यामुळे  अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक नरेंद्र पाटील हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जोपर्यंत शहराबाहेर अडवलेल्या लोकप्रतिनिधी आणि आंदोलकांना मोर्चा स्थळी येऊ दिलं जात नाही तोपर्यंत ठाण मांडण्याची भूमिका नरेंद्र पाटील यांनी घेतली होती. यानंतर काही प्रमाणात आंदोलक व लोकप्रतिनिधी यांना सोडण्यात आले.

आता मराठा आक्रोश मोर्चा काढताना तारीख देणार नाही, थेट ऍटॅक करू, असा इशारा देतानाच मराठा समाजाला आरक्षण द्या. त्यांना नक्षलवादी होऊ देऊ नका, असं आवाहन नरेंद्र पाटील यांनी केलं आहे. मोर्चात सहभागी हजारोंच्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते. सर्वपक्षीय नेत्यांसह विविध संघटनांनी देखील या मोर्चाला पाठींबा दिला होता. तर, वृद्धांपासून ते लहान वयातील मुले-मुली देखील या मोर्चात सहभागी झाले होते.

‘मराठा समाजाला आरक्षण द्या, मराठा तरुणांना नक्षलवादी होऊ देऊ नका असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच, ‘हे सरकार भविष्यात तुम्हाला अडचणीत आणू शकतं. त्यामुळे काळजी घ्या,’ असं देखील नरेंद्र पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!