मुंबई : विद्यमान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. विधानसभा अध्यक्षपद इतक्या अधिवेशनानंतरही रिक्त ठेवणे हे असंविधानिक असल्याचं म्हणत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
काँग्रेसच्या वाट्याला असलेलं विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्यात स्पर्धा असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्या आणि परवा म्हणजेच ५ व ६ जुलै या दोन दिवसांतच पार पडणार आहे. या अधिवेशनातच अध्यक्षांची निवड केली जाईल असं काँग्रेस नेते सांगत आहेत.
दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली असून या मंत्रिमंडळात अध्यक्षपदाच्या नावावर चर्चा करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. यावर आता काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. ‘विधानसभा अध्यक्षांची निवड ही होईलच सर्वांना काळजी ही कोरूनची आहे. कोरोना टेस्ट केल्यानंतरच समजू शकेल की किती आमदार या अधिवेशनात उपस्थित राहतात. त्यावरून अध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल निर्णय घेता येईल,’ असं थोरात म्हणाले आहेत. शिवसेनेसह काँग्रेसने सर्व आमदारांना अधिवेशन काळात पूर्ण हजर राहण्यासाठी व्हीप देखील जारी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- एमपीएससीला स्वातंत्र्य हवंच पण स्वैराचार नको; फडणवीसांनी सुनावलं
- ‘गोपीचंद पडळकरांना कोल्हापुरात फिरू देणार नाही’; राष्ट्रवादी आक्रमक
- ‘जहाँ हमारे नाम से आग लग जाती है!’, राऊतांचा शायरीतून वार
- ‘केंद्राचा कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा, आम्ही दुसरा आणणार’
- ‘एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी’ ; स्वप्निलच्या आईचा तळतळाट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
