Share

‘…तेव्हा आम्हाला सिनेमा दाखवला’, इराफाननं सांगितला द्रविड बाबतचा ‘तो’ किस्सा

Published On: 

इंग्लंड : एकाच वेळी भारताचे दोन क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणार आहे. प्रमुख खेळाडूचा संघ हा इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. तर इतर राखीव आणि युवा खेळाडूचा संघ हा श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर भारताचा माजी क्रिकेटपटु इरफान पठानने राहुल द्रविडचे कौतुक केले आहे. ‘राहुल द्रविड ज्याप्रकारे मार्गदर्शन करतो त्यामुळे त्या खेळाडुंना पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. आणि जेव्हा एखादा खेळाडू अपयशी होतो तेव्हा द्रविड ज्याप्रकारे त्या खेळाडूला मार्गदर्शन करतो त्याने त्या खेळाडुचा आत्मविश्वास वाढतो.’असे इरफाण पठाण म्हणाला.

यावेळी त्याने २००७ विश्वचषक स्पर्धेतील एक किस्सा देखील शेअर केला होता. ‘२००७च्या विश्वचषकात जेव्हा भारतीय संघाचा पराभव झाला होता. त्यावेळी कर्णधार राहुल द्रविड होता. पराभवानंतर टीम इंडियाचे आव्हान संपुष्टात आले होते. या पराभवानंतरचा एक किस्सा इराफाननं सांगितला आहे.

‘मला 2007 मधील वर्ल्ड कपच्या दरम्यान घडलेला एक प्रसंग आजही आठवतो. द्रविड, माझ्याकडं आणि धोनीकडं आला होता. आपण सर्वजण पराभवामुळे निराश आहोत. आपल्याला एक सिनेमा पाहिला पाहिजे,’ असा प्रस्ताव त्याने ठेवला. द्रविड नेहमीच तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करतो आणि त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा देतो. 2007 मधील पराभवानंतरही एक कॅप्टन म्हणून त्याने टीमला हेच सांगितले. ‘हा पराभव शेवट नाहीये, आयुष्य या पराभवापेक्षा नक्कीच मोठं आहे.’ असे म्हणाला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!