Share

‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’, परीक्षा पास होऊनही नोकरी न मिळाल्याने युवकाची आत्महत्या

Published On: 

🕒 1 min read

पुणे : एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात आत्महत्या केली आहे. स्वप्निल लोणकर (वय-२४) असे त्याचे नाव आहे. स्वप्निलने फुरसुंगी परिसरातीलराहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना बुधवारी (दि.२९ जून) रोजी घडली आहे. पण त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी काल आढळून आल्याने धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात तो पास देखील झाला होता. पण, यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. याच नैराश्यातून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले.

स्वप्नील शिक्षण पुर्ण झाल्यापासून एमपीएससीच्या परिक्षेची तयारी करीत होता. तो एमपीएससीच्या २०१९ च्या पुर्व व मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र त्याची मुलाखत दिड वर्षांपासून झालेली नव्हती. त्याचबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परिक्षा दिली. त्यामध्ये पुर्व परिक्षा तो उत्तीर्ण झाला, कोरोनामुळे मुख्य परिक्षा झाली नाही. या सगळ्या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मृत्युपुर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.

काय लिहिले आहे चिठ्ठीत?
एमपीएससी मायाजाल आहे. यात पडू नका. येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझे वाढत जाते. आत्मविश्वास तळाला पोहोचतो आणि स्वत: बद्दल शंका वाढत जाते. २ वर्षे झाली आहेत उत्तीर्ण होऊन आणि २४ वय संपत आलंय. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेले कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! कोरोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळे आणि चांगले असते. हवे ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झाले असते. मी घाबरलो, खचलो असे मुळीच नाहीये, फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता!

नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस ही मनात होती. पण काही तरी चांगल होईल, या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे आयुष्य सुरू राहू शकेल, असे काहीच उरलं नाहीये. यांस कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी निर्णय आहे. मला माफ करा! मला ब्लड डोनेशन करून १०० जीव वाचवायचे होते, ७२ राहिले…. जमले तर हे इतरांपर्यंत पोहोचावा, अनेक जीव वाचतील.’

स्वप्निलचा पार्श्वभूमी

स्वप्निलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बनविण्याचा छोटा प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. ते व त्यांच्या पत्नी असे दोघेजण संबंधीत व्यावसाय पाहतात. तर स्वप्निलने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली होती. स्वप्निलला दहावीत ९१ टक्के मिळाले होते. तो अनेक सामाजिक उपक्रमांमधेही तो सहभागी असायचा. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालो की वडिलांनी गावाकडे घर बांधण्यासाठी घेतलेले कर्ज फेडण्याचे स्वप्निलच स्वप्न होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!