🕒 1 min read
लातूर: शहराच्या बाह्यवळण रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे शहरात होणारी रहदारी काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळू शकते. मात्र बाह्यवळण रस्त्याच्या कामाला मंजुरी जरी मिळाली असली तरी काम सुरु होण्याची प्रतीक्षा येथील नागरिकांना करावी लागणार आहे. मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली, यावेळी पालकमंत्री अमित देशमुख तसेच अशोक चव्हाण उपस्थित होते.
या बैठकीत प्रामुख्याने लातूर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या ६१ किलोमीटर नवीन बाह्यवळण रस्त्याच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. तर आतापर्यंत ५० किमीचे भूसंपादन झाले आहे. राहिलेल्या ११ किमीमध्ये रस्ता अस्तित्वात आहे. या बाह्यवळण रस्त्याचे काम लवकर सुरू व्हावे. यासाठी आशियाई विकास बँकेकडून अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश बांधकाम मंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.
शहरात गाड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे तसेच अनेक ठिकाणी अरुंद रस्ते असल्यामुळे शहरात संध्याकाळच्यावेळी रहदारी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ त्या रहदारीत अडकून बसावे लागत आहे. त्याच सोबत अवजड वाहने देखील शहरातून जातात त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा अनेक वेळा होतो. अशा परिस्थितीत शहराच्या बाह्यवळण रस्ता तयार झाला तर येथील नागरिकांना बर्यापैकी दिलासा मिळण्याची शक्याता आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही’ ; राजू सापतेंच्या आत्महत्येनंतर मनसे आक्रमक
- मराठी कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या, व्हिडिओद्वारे सांगितलं सुसाईडचे कारण
- बुलडाण्यात समाधानकारक पाऊस; ६६ टक्के पेरण्या आटोपल्या!
- अण्णा हजारे हे कायम कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या निशाण्यावर का असतात ?
- ‘देशात मुर्खता मोठ्या प्रमाणात’ ; मंदिरा बेदीला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांवर भडकली सोना मोहपात्रा


