Share

‘फुकटचे श्रेय घेण्याचा मंत्री महोदयांचा प्रयत्न’, पंकजा मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

बीड: जिल्ह्यातील परळी बायपास व परळी धर्मापुरी या महामार्ग कामाच्या श्रेयावरून राजकारण चांगलंच रंगताना दिसत आहे. एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या महामार्गासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न केले असल्याचे बोलले जात आहे, मात्र दुसरीकडे फुकटचे श्रेय घेत असल्याची टीका त्यांच्यावर पंकजा मुंडे यांनी केली आहे.

परळी बायपास व परळी धर्मापुरी रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. दहा पैशाचे योगदान नसताना, दहा रुपयाचा निधी आणण्यात अपयशी ठरलेल्या मंत्री महोदयांचा फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दहा पैश्याचे योगदान नसताना दहा रुपयाचा निधी देखील आणण्यात अपयशी ठरलेल्या मंत्री महोदयांचा फुकटचे श्रेय ओरपण्यासाठी केंद्र सरकार कडून मुंडे भगिनींनी आणलेल्या परळी बायपास व परळी धर्मापुरी राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजनाचा केविलवाणा कार्यक्रम. अशा शब्दात त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!