🕒 1 min read
इंग्लंड : संपुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. चौथ्या डावात भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्युझीलंडने ८ गडी राखुन सहज पार केले. या सामन्यानंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.
इंग्लंड संघासोबतच्या कसोटी मालिकेसाठी बराच वेळ शिल्लक असल्यामुळे भारतीय संघ आता तीन आठवड्यांच्या सुट्टीवर असेल 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्याअगोदर तीन आठवड्यांचा आराम घेऊन खेळाडू 14 जुलै रोजी सरावासाठी परत एकत्र येतील. या सुट्टीत खेळाडू कुटुंबीयांसह इंग्लंडमध्ये भटकंती करताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/CQtZkd4sCvb/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील या सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. अनुष्का शर्मा देखील इंग्लंडमध्ये फिरताना दिसली आहे. यावेळी अनुष्का विराट सोबत नव्हे तर लेकं वामीका सोबत ती इंग्लंडच्या रस्त्यावर फिरताना दिसली. यामुळे अनुष्काआणि वामीक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळीही चाहत्यांना वामीकाचा चेहरा दिसला नाही त्यामुळे चाहते पुन्हा एकदा निराश झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- के एल राहुल कर्णधार विराटचा फेवरेट पण राहुलचा फेवरेट कर्णधार माहीच
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आपल्याच कर्णधाराला ठेवलं टीमबाहेर
- ‘गब्बर’च्या टीमचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण ; सरावाला सुरवात
- ‘अमित शाह यांच्या मुलाची संपत्ती देखील भरमसाठ वाढलीये’; ईडी कारवाईवरून नाना पटोलेंचा टोला
- जो समाज मागासलेलाच नाही त्यांना आरक्षण मिळूच शकत नाही – गुणरत्न सदावर्ते
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

