Share

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आपल्याच कर्णधाराला ठेवलं टीमबाहेर

Published On: 

इंग्लंड : इंग्लंड दौऱ्यावरील डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना गमावल्यानंतर भारतीय संघ 20 दिवसाच्या सुटीवर आहे. ही सुटी संपल्यानंतर भारतीय संघ हा इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. मात्र या मालिकेपुर्वी भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गील जायबंदी झाला आहे.

शुभमन गील जायबंदी झाल्यामुळे त्याच्या जागी रोहित शर्माच्या जोडीला कोणत्या खेळाडूची वर्णी लागते याची उत्सुकता क्रिकेट रसिंकाना लागली आहे. गिलला दुखापत झाल्यामुळे ओपनर म्हणून कोणाला खेळवायचं, याबाबतचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न विराट कोहली आणि टीम मॅनेजमेंट करत आहे. शुभमन गिलच्या जागी केएल राहुल आणि मयंक अग्रवाल असे दोन पर्याय आहेत. यावरूनच भारताचा माजी ओपनर वसीम जाफर याने विराट कोहलीला सल्ला दिला आहे. मयंक अग्रवालला ओपनर म्हणून संधी दिली पाहिजे, असं मत जाफरने मांडलं आहे. केएल राहुल आयपीएलमध्ये ज्या पंजाब किंग्सचा कर्णधार आहे, त्याच टीममध्ये वसीम जाफर बॅटिंग प्रशिक्षक आहे.

आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना तो म्हणाला, शुभमन गीलच्या दुखापतीमुळे मयंक अग्रवाल आणि लोकेश राहुल साठी खेळण्याची ही चांगली संधी आहे. पण शुभमन गीलच्या जागी  मयंक अग्रवालला प्राथमिकता दिली पाहिजे, मागील काही वर्षातील त्याची कामगिरी शानदार आहे. तसेच राहुलला कसोटीत नव्या चेंडूविरुद्ध खेळताना अडचणी येत असल्याचे मागील वर्षी दिसून आले. तो मधल्या फळीत चांगली फलंदाजी करू शकतो.’ असं जाफर म्हणाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!