Share

पुन्हा नाका बंदी सुरु! तरीही चोरट्यांनी तीन दुचाकी लांबवल्या

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : शहराच्या विविध भागातून तीन दुचाकी चोरांनी लांबवल्या. मोहम्मद रिजवान मोहम्मद कदीर (वय ३२, रा. उस्मानपुरा, पीरबाजार) हे २३ जून रोजी दुपारी अडीचच्या सुमारास एमजीएम रुग्णालयासमोरील गेटजवळ दुचाकी (एमएच-२०-एफएच-९८१६) उभी करुन गेले होते. त्यानंतर अवघ्या पाऊण तासात त्यांची दुचाकी चोराने लांबवली.

तसेच महानगर पालिकेतील कर्मचारी विठ्ठल हरिश्चंद्र बमणे (वय ३८, रा. पिसादेवी रोड, सोनाईनगर, हर्सुल) यांनी मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घरासमोर दुचाकी उभी केली होती. त्यांची दुचाकी भरदिवसा चोराने लांबवली.

तर माजी सैनिक विनायक किसन पवार (वय ३६, रा. अष्टविनायक पार्क, तीसगाव) यांनी २६ जून रोजी रात्री घरासमोर दुचाकी (एमएच-२४-बीजे-०४७६) उभी केली होती. त्यांची देखील दुचाकी चोराने हँडल लॉक तोडून लांबवली. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!