🕒 1 min read
औरंगाबाद : शिल्लेगाव हद्दीतील परिसरात व इतर ठिकाणी चोरी, दरोड्यासारखे गुन्हे करून पळून जाणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या शिल्लेगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्यावर विविध ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पोलिसांना गुप्तरीत्या माहिती मिळाली की, ताराचंद विरुपन भोसले, शक्तूर भोसले दोघे रा. गाजगाव, ता. गंगापूर हे गुन्हा करण्याच्या उद्देशाने शिल्लेगावात येत आहे. त्यानंतर त्यांना सापळा लावून पक्ण्यात आले. या गुन्हेगारांनी पोलीस ठाणे शिल्लेगाव, वैजापूर, वाळूज,गंगापूर हद्दीत चोरी, जबरी चोरी, दरोड्याचा टाकण्याचा प्रयत्न करणे , दरोडा असे अनेक प्रकारचे गुन्हे केलेले असून ते वरील पोलीस ठाणे येथे पाहिजे व फरारी म्हणून घोषित केले होते.
हि कारवाई मा.पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल ढाकणे, पोलीस अंमलदार रमेश अफसनवाड, सविता वरपे, मनोज नवले, विठ्ठल जाधव, मनोज औटे, सचिन चव्हाण, शुभम पालवे, संतोष गिरी यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसांना केंद्रात बोलावून भाजप स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल ?
- इन्स्टावर व्हायरल होणार भूत आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; पहा व्हिडिओ
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे ! जाणून घ्या किती आहे रक्कम
- ‘राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील दगडफेकीला योग्य उत्तर दिलं जाईल, भाजपसाठी ही धोक्याची घंटा’
- ‘शरद पवार कृषी तज्ज्ञ, कृषीमंत्री राहिले तरी शेतकरी समाधानी का नाहीत?’, निलेश राणेंचा प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

