🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाच्या महामारीमुळे आषाढी यात्रा रद्द करण्यात आली असली तरी पंढरीच्या वारीची मोठी परंपरा असलेल्या पैठण येथील शांतिब्रम्ह संत एकनाथ महाराजांच्या यांच्या पालखी दिंडी सोहळ्याचे औपचारिक प्रस्थान झाले.यावेळी पैठण पोलिसांनी पो.नि.किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा बंदोबस्त ठेवला होता
दरम्यान, शासन निर्देश येईपर्यंत दिंडी प्रस्थान पालखीचा पैठण येथे नाथांच्या समाधी मंदिरात मुक्काम राहणार आहे. त्यानंतर शासनाच्या सुचनेनुसार १९ जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशीला नाथांच्या पादुकांचा सोहळा मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत दाखल होणार आहे. यात्रा होणार नसल्यामुळे वारकरी व भाविकांच्या मनोमनी विठ्ठलाचे नामस्मरण करीत भाविकांनी पादुका दर्शन घेतले
कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी मोजक्याच भाविकांच्या उपस्थिती परंपरेनुसार नाथांचा विधीवत दिंडी प्रस्थान सोहळा पार पडला शासनाने पायी दिंडी रद्द केल्याने पायी दिंडी सोहळा होणार नसल्याने १९ जुलै २०२१ रोजी आषाढी एकादशी यात्रेला पंढरपुरला दर्शनासाठी शासनाने दिलेल्या नियम, अटीच्या परवानगीनुसार पालखी पादुका सोहळा नेण्यात येणार असल्याची माहिती नाथवंशज हभप रघुनाथ बुवा पालकीवाले यांनी या प्रसंगी दिली
रितीरिवाजानुसार ठरल्या प्रमाणे नाथांच्या वाडयातून सकाळी नाथांच्या पादुकांचे विधिवत पुजन करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांनी अभंगवाणी करुन नाथांचा जयजयकार करीत टाळ मृदंगाच्या गजरात पालखी खांद्यावर घेवुन टाळ गोदाकाठी पालखी ओटा येथे आणली.
यावेळी भाविकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालुन दिलेल्या शारिरिक अंतरासह सर्व नियम पाळुन पालखीतील नाथ पादुकांचे दर्शन घेतले. गर्दीचे बंधन असल्यामुळे जेमतेम भाविकांची उपस्थिती होती. यावेळी पालकी ओटा येथुन पालखी नाथांच्या समाधी मंदिरात आणण्यात आली.प्रस्थान प्रसंगी नाथवंशज तथा पालखी दिंडी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी, हभप चंद्रकांत तहसीलदार चंद्रकांत शेळके ,नगराध्यक्ष सुरज लोळगे, उपनगराध्यक्ष सुचित्रा जोशी,नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे,हभप चंद्रकांत अंबिलवादे महाराज,काकडे महाराज भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, नगरसेवक भुषण कावसनकर,ज्ञानेश घोडके, सिद्धार्थ परदेशी,पोलिस निरीक्षक पो.नि.किशोर पवार,सपोनि. गजानन जाधव,उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, उपनिरीक्षक,छोटुसिंग गिराशे तसेच महिला पोलीस आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसांना केंद्रात बोलावून भाजप स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल ?
- इन्स्टावर व्हायरल होणार भूत आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; पहा व्हिडिओ
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे ! जाणून घ्या किती आहे रक्कम
- ‘राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील दगडफेकीला योग्य उत्तर दिलं जाईल, भाजपसाठी ही धोक्याची घंटा’
- ‘शरद पवार कृषी तज्ज्ञ, कृषीमंत्री राहिले तरी शेतकरी समाधानी का नाहीत?’, निलेश राणेंचा प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

