🕒 1 min read
औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील पेंडगाव येथील माणूसकीचे दर्शन घडले. गेल्या काही दिवसापासून निराधार वयोवृध्द बहीण भाऊ एकत्र राहत होते. परंतु त्यांना आधार देणारं कोणी नसल्याने गावकऱ्यांनी त्यांना वृध्दाश्रमात दाखल करण्याचा निर्णय घेतला. गावातील व परिसरातील अनेक हात धावून आले आहेत. तसेच यात पोलिस प्रशासन ही मदतीसाठी धावून आले आहेत.
पेंडगाव येथील धोंडाबाई आणि सखाभाऊ हे दोन्ही भावंडं निराधार आहेत, वयोवृध्द असल्याने त्यांना वृद्धाश्रमात दाखल करण्यासाठी गावाने सामाजिक बांधिलकी जपत त्यांना मदतीसाठी आवाहन केले. यानंतर विविध क्षेत्रातून त्यांना जवळपास आतापर्यंत आर्थिक स्वरूपात १५ हजारापर्यंत मदत झाली. तर ५ क्विंटल इतके धान्य जमा झालेत. यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनेही पुढे येऊन वडोदबाजार पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी ही या निराधार भावडांना वस्त्रदान करून मदतीचा हात पुढे केला. या निराधार भावंडाना वृद्धपणी गैरसोय होऊ नयेत म्हणून त्यांना औरंगाबाद येथे वृद्ध आश्रमात दाखल करण्यात येणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले . पेंडगावच्या या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यामुळे सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
पोलिसही धावले मदतीसाठी…!
निराधार बहीण – भावाच्या मदतीसाठी वडोदबाजार पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव या स्वतः पेंडगाव येथे येऊन या दोघांनाही त्यांच्या वतीने त्यांनी वस्त्रदान केले. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने सामाजिक मदतीने एक वेगळा आदर्श दिसून आला. यावेळी सरपंच रंजना व्यवहारे, उपसरपंच निर्मला शिंदे, नारायण व्यवहारे, बाबूराव डकले, सचिन व्यवहारे इतर उपस्थीत होते.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसांना केंद्रात बोलावून भाजप स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल ?
- इन्स्टावर व्हायरल होणार भूत आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; पहा व्हिडिओ
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे ! जाणून घ्या किती आहे रक्कम
- ‘राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील दगडफेकीला योग्य उत्तर दिलं जाईल, भाजपसाठी ही धोक्याची घंटा’
- ‘शरद पवार कृषी तज्ज्ञ, कृषीमंत्री राहिले तरी शेतकरी समाधानी का नाहीत?’, निलेश राणेंचा प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

