🕒 1 min read
नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे या दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. महत्त्वाचे म्हणजे या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फडणवीस यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याचे समजते. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात आले आणि त्यानंतर राज्यातील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला मोजके आणि महत्त्वाचे भाजप नेते उपस्थित होते. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ सक्रिय झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान या सर्व घडामोडींवर भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य केले आहे. ‘फडणवीस-शाह भेटीचा राज्य सरकार पाडण्याशी संबंध नाही’ असे दानवेंनी सांगितले.
ते म्हणाले, ‘विरोधी पक्षनेत्याने केंद्रातील नेत्यांना भेटणं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीतील नेत्यांच्या भेटी घेण्याशी सरकार पाडण्याचा काहीच संबंध नाही. पक्ष वाढीसाठी या भेटी असतात. सरकार पाडण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सरकार पाडण्याच्या नादात नाही. राज्यातील सत्ताधारीच सरकार पाडण्याच्या वावड्या उठवून संभ्रम निर्माण करत आहेत’, असा दावा दानवे यांनी केला.
जनतेला धोका देऊन केलेली युती जनतेला मान्य नाही
राज्यात जे काही सुरू आहे ते जनतेला मान्य नाही. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती अनैसर्गिक आहे, आमची तयारी सुरू झालेली आहे. २०२४ च्या निवडणुकीत यांना आम्ही नक्की धडा शिकवू, असा घणाघात दानवे यांनी महाविकास आघाडीवर केला. ‘महाविकास आघाडी सरकारची ही युती जनतेला धोका देवून करण्यात आली आहे. शिवसेना आणि भाजप ही जनतेच्या मनातली युती होती. उद्धव ठाकरेंनी ती युती तोडली असून जनता याचा बदला २०२४ च्या निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आमची तयारी देखील सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’? शाह-फडणवीस यांच्या भेटीमागे दडलंय काय?
- ‘पदोन्नती आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सरकारला निर्णय घेणे अशक्य’
- जरंडेश्वर कारखान्यावरील कारवाईनंतर अजित पवारांचे प्रथमच भाष्य, म्हणाले..
- ‘सर्व काही नियमांनुसारच!’, राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे उत्तर
- फडणवीसांना केंद्रात बोलावून भाजप स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

