🕒 1 min read
इंग्लंड : संपुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. चौथ्या डावात भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्युझीलंडने ८ गडी राखुन सहज पार केले. या सामन्यानंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.
इंग्लंड संघासोबतच्या कसोटी मालिकेसाठी बराच वेळ शिल्लक असल्यामुळे भारतीय संघ आता तीन आठवड्यांच्या सुट्टीवर असेल 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्याअगोदर तीन आठवड्यांचा आराम घेऊन खेळाडू 14 जुलै रोजी सरावासाठी परत एकत्र येतील.
https://www.instagram.com/reel/CQ0KmqvJ9PT/?utm_source=ig_web_copy_link
या सुट्टीत खेळाडू कुटुंबीयांसह इंग्लंडमध्ये भटकंती करताना दिसत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील या सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. अनुष्काने आपल्या इंस्टग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत अनुष्का विराट सोबत एक चॅलेंज करताना दिसत आहे. एकीकडे विराट बॅटला बॅलेन्स करत आहे तर दुसरीकडे अनुष्का देखील तेच करत आहे. दोघांमध्ये ज्याची बॅट आधी खाली पडेल तो विजेता ठरणार. अशी ही स्पर्धा दोघांमध्ये लागली आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओत अनुष्का आणि विराट फार क्युट दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना फार आवडला आहे. त्यांच्या या व्हिडीओवरती नेटकरी भरभरून कमेंट्स देखील करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- जरंडेश्वर कारखान्यावरील कारवाईनंतर अजित पवारांचे प्रथमच भाष्य, म्हणाले..
- ‘सर्व काही नियमांनुसारच!’, राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे उत्तर
- फडणवीसांना केंद्रात बोलावून भाजप स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल ?
- इन्स्टावर व्हायरल होणार भूत आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; पहा व्हिडिओ
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे ! जाणून घ्या किती आहे रक्कम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

