🕒 1 min read
मुंबई – राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासोबत इतर छोटे पक्षही सहभागी आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांमध्ये अनेकदा शीतयुद्ध दिसून येते मात्र आता राज्यातील या महाविकास आघाडीत सहभागी असणारे छोटे पक्ष देखील नाराज असल्याचं दिसून येत आहे.
समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी यासंदर्भात जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. आमची गरज असेल तेव्हाच बोलवू नका, महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नको म्हणून आम्ही महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. परंतु या सरकारमध्ये कोणीही ऐकत नाही, आमचा फोन देखील उचलला जात नाही असं म्हणत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.
आझमी यांनी बकरी ईदबाबत नियमावलीबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नसल्याने त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही आलो आहोत. पुरोगामी विचारांना आम्ही बांधील आहोत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडूक होणार असेल तेव्हा आमची आठवण होईल. आम्हाला भेटा, आमचे प्रश्न जाणून घ्या त्याशिवाय आम्ही काही मागत नाही असं अबु आझमी म्हणाले.
दुसऱ्या बाजूला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी, नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर यांनी मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात महाविकास आघाडी सरकारने ठाम भूमिका मांडण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला वेळ देत नाहीत, अशी खंतही शेट्टी यांनी पवार यांच्याकडे व्यक्त केली आहे.
दरम्यान,या कारणांशिवाय अन्य छोट्या घटक पक्षांना महामंडळ वापट होऊन पदरात काहीतरी पडेल अशी आशा होती मात्र तो प्रश्न देखील प्रलंबित राहिल्याने ते देखील नाराज असल्याची चर्चा आहे. घटक पक्षांच्या नेत्यांची कामे देखील सरकारमध्ये असूनही होत नसल्याची देखील काही नेत्यांची तक्रार आहे. एका बाजूला प्रमुख तीन पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करत असताना दुसऱ्या बाजूला छोटे घटक पक्ष देखील नाराज झाल्याने महाविकास आघाडी सरकारच्या समोरील अडचणी वाढू शकतात अशी शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसांना केंद्रात बोलावून भाजप स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल ?
- इन्स्टावर व्हायरल होणार भूत आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; पहा व्हिडिओ
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे ! जाणून घ्या किती आहे रक्कम
- ‘राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील दगडफेकीला योग्य उत्तर दिलं जाईल, भाजपसाठी ही धोक्याची घंटा’
- ‘शरद पवार कृषी तज्ज्ञ, कृषीमंत्री राहिले तरी शेतकरी समाधानी का नाहीत?’, निलेश राणेंचा प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

