मुंबई : देशात कोरोनाचे संकट वाढल्याने सरकारकडून काही नियम लागू करण्यात आले आहे. यामुळे अनेक क्षेत्राना अडचणीचा सामना करावा लागला आहे. यातील एक म्हणजे मनोरंजन क्षेत्र. कोरोनामुळे चित्रपटगृह बंद असल्याने चित्रपट प्रदर्शित होण्यास अडचणी आल्या आहेत. मात्र यावर पर्याय म्हणून अनेक सुपरस्टार्स डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सामील होत आहेत. यात आता माधुरी दीक्षित देखील तिच्या नवीन इनिंगसाठी सज्ज झाली आहे.
माधुरी दीक्षित करण जोहरच्या प्रोडक्शनमधून डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. करण जोहरची डिजिटल कंटेंट प्रोडक्शन कंपनी माधुरी दीक्षितसोबत एक नवी वेब सीरीज बनवत आहे. बिजॉय नांबियार आणि करिश्मा कोहली या सीरीजचे दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेचे नाव खूप खास असणार आहे. माधुरी दीक्षितची ही वेब सीरीज ‘फॅमिली ड्रामा’ असणार आहे. ‘दीवार’ चित्रपटाच्या ‘मेरे पास माँ है’ या संवादातून त्याचे नाव ठेवण्यात येणार आहे. नावाप्रमाणेच ही सीरीज देखील विशेष असणार आहे.
माधुरी दीक्षितची ही नवी सीरीज ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. माधुरी ही एक अभिनेत्री आहे, जी नेहमीच वादापासून दूर राहते. आता वयाच्या ५४ व्या वर्षी ती पहिली वेब फिल्म करून नवी इनिंग सुरु करणार आहे. बॉलिवूडची धकधक गर्लला डिजिटल विश्वात पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीत छोट्या घटक पक्षांची होतेय फरफट ?
- ‘पदोन्नती आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सरकारला निर्णय घेणे अशक्य’
- ‘ओबीसी समाजाचे नेते आरक्षणासाठी एकत्र येतात मग मराठा समाजाचे नेते का येत नाहीत?’
- ‘या’ गोष्टीशिवाय संजय राऊतांना जेवणच पचत नाही; देवेंद्र फडणवीस यांचा टोला
- पायी वारीचा मुद्दा चिघळला; बंडातात्या कराडकर यांना दिसता क्षणीच अटक करण्याचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

