🕒 1 min read
चंद्रपूर : साताऱ्यामधील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याशी संबंधित जमीन, इमारत, प्लांट, मशीन अशा ६५ कोटी ७५ लाख रुपयांच्या मालमत्तेवर गुरूवारी सक्तवसुली संचलनालयाने टाच आणली आहे. या कारखान्याचा संबंध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जोडला जात आहे. मात्र, आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांनी सर्व आरोप फेटाळलेत. पण आता या मुद्यावरुन राजकारण सुरु झालं आहे.
‘जे सत्ता स्थापन करण्यात किंवा सत्तेत महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यावर कारवाया केल्या जातात. एका कारखान्यावर लाखों लोकांचं जीवन अवलंबून आहे. कारवाई करण्याची धमकी दिली जातेय. हे निर्मळ राजकारण नाही. आमने सामने लढाई करावी. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. ईडी, सीबीआयचा हा वापर हा तर पाठीतला वार आहे. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेणार नाही. पण राज्याला हे शोभा देत नाही’, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता.
यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘संजय राऊत भाजपवर रोज काही ना काही आरोप करत असतात. त्यांना भाजपवर आरोप केल्याशिवाय जेवणच पचत नाही’, असा टोला फडणवीस यांनी लगावला. फडणवीस कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ गावी मूल येथे आज आले होते. येथून परतताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ईडीच्या माध्यमातून सत्तांतर घडविण्यात येत असल्याच्या वार्ता केवळ आरोप असल्याचेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- जरंडेश्वर कारखान्यावरील कारवाईनंतर अजित पवारांचे प्रथमच भाष्य, म्हणाले..
- ‘सर्व काही नियमांनुसारच!’, राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे उत्तर
- फडणवीसांना केंद्रात बोलावून भाजप स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल ?
- इन्स्टावर व्हायरल होणार भूत आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; पहा व्हिडिओ
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे ! जाणून घ्या किती आहे रक्कम


