🕒 1 min read
श्रीलंका : शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ सोमवारी श्रीलंकेत दाखल झाला. श्रीलंकेत टीम इंडिया तीन एकदिवसीय सामने आणि तब्बल टी -20 सामने खेळणार आहे. या दौर्याची सुरुवात वनडे मालिकेपासून होईल. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी, दुसरा 16 रोजी आणि तिसरा वनडे 18 रोजी खेळला जाईल. भारताचे प्रमुख खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये असल्याने या दौऱ्यासाठी नवख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला असून २९ जून ते १ जुलै पर्यंतचा आपला क्वारंटाईन कालावधीत पूर्ण करून सर्व खेळाडू आता एकत्र आले आहेत. २ ते ४ जुलै या कालावधीत त्यांना सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ५ जुलैपासून हा संघ एकत्र सराव करण्यास सुरुवात करणार आहेत.
मात्र, या सामन्यापूर्वी श्रीलंका क्रिकेटमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि प्रमुख खेळाडूंमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादानं आणखी गंभीर वळण घेतलं आहे. श्रीलंकेच्या पाच खेळाडूंनी भारताविरुद्धच्या मालिकेसाठी असलेल्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. लाहिरु कुमारा, कशून रजिता. विश्वा फर्नांडो, अशेन बंडारा आणि लसिथ एबुलडेनिया या पाच जणांनी करार करण्यास नकार दिला. इतकंच नाही तर, हे सर्व टीमचा कॅम्प सोडून निघून गेले आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एश्ले डी सिल्वा यांनी ही माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसांना केंद्रात बोलावून भाजप स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल ?
- इन्स्टावर व्हायरल होणार भूत आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; पहा व्हिडिओ
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे ! जाणून घ्या किती आहे रक्कम
- ‘राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील दगडफेकीला योग्य उत्तर दिलं जाईल, भाजपसाठी ही धोक्याची घंटा’
- ‘शरद पवार कृषी तज्ज्ञ, कृषीमंत्री राहिले तरी शेतकरी समाधानी का नाहीत?’, निलेश राणेंचा प्रश्न


