🕒 1 min read
मुंबई : जगभरात स्टाईल आयकॉन म्हणून अष्टपैलू अभिनेत्री प्रियांका चोप्रा ओळखली जाऊ लागली आहे. तिने खडतर प्रवासानंतर यशाचे शिखर गाठले आहे. तिच्या अभिनयाने तिने बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रियांका सोशल मिडियावर चांगलीच सक्रीय असते. त्यामुळेच तिचा सोशल मीडियावरील भाव चांगलाच वाढला आहे.
हॉपरएचक्यू या वेबसाईटनं सेलिब्रिटींना इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यासाठी किती रुपयांचं मानधन दिलं जातं याचं संशोधन त्यांनी केलं. या यादीत एकूण ३९५ सेलिब्रिटींचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत पहिल्या तीस सेलिब्रिटींमध्ये केवळ दोन भारतीय आहेत. यात प्रियांका चोप्रा २७ व्या स्थानावर आहे. यामुळे सध्या प्रियांका चांगलीच चर्चेत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तिला एका पोस्टसाठी कमीतकमी ३ कोटी रुपयांचं मानधन दिलं जातं. या यादीत विल स्मीथ, डेव्हिड बेकम, एमा वॉटसन यांसारखे अनेक नामांकित हॉलिवूड सेलिब्रिटी आहेत. प्रियांकासोबत भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली १९ व्या स्थानावर आहे. त्याला एका पोस्टसाठी पाच कोटी रुपये दिले जातात.
प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, लवकरच तिचा ‘टेक्स्ट फॉर यू’ हा हॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचे शूटींग देखील तिने संपवले. याआधी ती ‘वी कॅन बी हिरोज’ या हॉलिवूडपटात दिसली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसांना केंद्रात बोलावून भाजप स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल ?
- इन्स्टावर व्हायरल होणार भूत आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; पहा व्हिडिओ
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे ! जाणून घ्या किती आहे रक्कम
- ‘राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील दगडफेकीला योग्य उत्तर दिलं जाईल, भाजपसाठी ही धोक्याची घंटा’
- ‘शरद पवार कृषी तज्ज्ञ, कृषीमंत्री राहिले तरी शेतकरी समाधानी का नाहीत?’, निलेश राणेंचा प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

