🕒 1 min read
औरंगाबाद : भारताचा औद्योगिक विकास ऑरिक सिटीतून दिसतो. औरंगाबाद शहर सातत्याने उद्योग क्षेत्रात आघाडीवरच राहील. या ठिकाणचे ऑटोक्लस्टर महत्त्वपूर्ण आहे. इतरांसाठी ते मार्गदर्शक राहिल. कोरोनासारख्या कठीण काळातही राज्य सरकारच्या उद्योग विभागानेही जवळपास विविध देशी, विदेशी ६० कंपन्यांसोबत दोन लाख कोटींचे सामंजस्य करार केले आहेत, अशा प्रकारे राज्यात औद्योगीकरणात वाढ होत असल्याची माहिती उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
रेल्वे स्टेशन परिसरातील चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) इमारत नूतनीकरण कार्यक्रमात देसाई बोलत होते. यावेळी आ. अंबादास दानवे, आ. अतुल सावे, सीएमआय अध्यक्ष कमलेश धूत, उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू सीएमआयए, मसिआ, जिल्हा व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी देसाई म्हणाले, राज्यात मोजक्याच औद्योगिक असोसिएशन आहेत, ज्यांच्या स्वत:च्या इमारती आहेत.
त्यात सीएमआयएचा क्रमांक लागतो. सामाजिक भान जपत सीएमआयएने कोरोना काळात जिल्ह्याला मोठ्याप्रमाणात आरोग्य यंत्रणेला पूरक साधन सामग्री पुरविण्यासाठी पुढाकार घेतला. औद्योगिक क्षेत्रात राज्यात औरंगाबाद आघाडीवर आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये राज्यात नमुनेदार अशी ऑरिक सिटी उभारण्यात आली आहे.
भारताचा औद्योगिक विकास ऑरिक सिटीतून दिसतो. औरंगाबाद शहर सातत्याने उद्योग क्षेत्रात आघाडीवरच राहील. या ठिकाणचे ऑटोक्लस्टर महत्त्वपूर्ण आहे. इतरांसाठी ते मार्गदर्शक असल्याचे देसाई म्हणाले. औरंगाबादबरोबरच राज्यातील इतर जिल्ह्यांचाही विकास करण्यासाठी शासन कटीबद्ध असून ऑस्ट्रेलियाची वीज क्षेत्रात काम करणारी व्हिटारा कंपनी यवतमाळ जिल्ह्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारशी पंगा अंगलट! ट्विटरवर पॉक्सो, आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात बीडच्या इरफान शेखला दिल्लीत अटक
- ऐतिहासिक बिबी-का-मकबरा परिसराने अखेर घेतला अतिक्रमणमुक्त मोकळा श्वास! औरंगाबाद मनपाची कारवाई
- ग्रामविकास निधीवर डल्ला; डेप्युटी सीईओला ७ वर्षे सश्रम कारावास
- समता फाऊंडेशनचे उल्लेखनीय कार्य! ३० हजार जणांचे मोफत लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
