बीड : नगर बीड रेल्वे मार्ग भूसंपादन प्रश्न संबंधी खासदार प्रीतम मुंडे आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आष्टी येथे तहसील कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यासाठी उपस्थित राहताना त्यांनी आष्टी येथील नियोजित रेल्वे स्टेशन इमारत आणि कडा येथील रेल्वे मार्ग कामाची पाहणी केली.
कडा येथे नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करताना उड्डाणपुलाची गरज असताना दीड किलोमीटर लांबीचा वळण रस्ता तयार केला आहे. या रस्त्यामुळे वाहनधारकांना वळसा घालून जावे लागते. त्याचप्रमाणे भविष्यात वाहतूक वाढल्यास तो वळण रस्ता गैरसोयीचा ठरणार आहे. त्यामुळे याठिकाणी उड्डाणपूल करण्याची लोकांची मागणी आहे. खासदार डॉ. मुंडे यांनी या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि रेल्वे अधिकाऱ्यांना उड्डाणपुलासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
कडा केरुळ मार्गावर रेल्वेमुळे तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या कडेला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी त्यांच्याकडे केली. माजी आमदार भीमसेन धोंडे , जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सविता गोल्हार, डॉ शैलजा गर्जे, विजय गोल्हार, वाल्मिक निकाळजे, भाजप जिल्हा सरचिटणीस शंकर देशमुख यांच्या सह स्थानिक ग्रामस्थ आणि रेल्वे अधिकारी यावेळी उपस्थित होते. रेल्वे उड्डाणपुलाचा तुम्ही फक्त प्रस्ताव सादर करा, बजेट मंजूर करून आणायची जबाबदारी माझी या शब्दात रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना करून डॉ. प्रीतम मुंडे यांनी रेल्वे उड्डाणपुलाची मागणी करणाऱ्यांना आश्वस्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
- आ.धस यांच्या मोर्चाकडे भाजपचीच पाठ, ‘जेष्ठ’ नेत्यांच्या कानमंत्राने पदाधिकारी फिरकलेच नाहीत
- नांदेडमध्ये मानपान नाट्य; खा.चिखलीकर आणि आ.शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, पाहा व्हिडिओ
- ‘सत्तेसाठी भाजप नेत्यांची धडपड सुरू’, अशोक चव्हाणांची टीका
- ‘जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?’, भाजप आ.अतुल भातखळरांचा सवाल
- अण्णा पुन्हा दिसणार; ‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिका लवकरच येणार भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
