🕒 1 min read
पुणे – पुणे महापालिकेच्या विविध प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्याच्या मंत्रिमंडळातील आठ मंत्री, वेगवेगळ्या पाच खात्यांचे सचिव आणि पुणे महापालिकेचे आयुक्त उपस्थित असणार आहेत. तसंच पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदारही या बैठकीला उपस्थित असतील. मात्र या बैठकीला पुण्याच्या महापौरांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही.
पुणे महानगरपालिकेत भाजपचे महापौर मुरलीधर मोहोळ हे सध्या कार्यरत आहेत. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी अजित पवार मात्र अधिकाऱ्यांच्या मार्फत कारभार हाकण्याचा प्रयत्न पवार करत असल्याचं यातून पुन्हा एकदा दिसून येत आहे. या प्रकरणात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पुन्हा एकदा पेटणार असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, महापौरांनी याबाबत उघड नाराजी व्यक्त केली असून अजित पवार यांना इशारा सुद्धा दिला आहे. मी नेहमी समन्वयाने पुढे जाण्याचे धोरण ठेवतो. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात पुण्याला मदत मिळत नसतानाही मी कधी राजकारण केलं नाही. मात्र, आता मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण मला देण्यात आले नव्हते. हा व्यक्तिशः माझाच नव्हे तर पुणेकरांचाही अपमान आहे. ही गोष्ट पुणेकर कायम लक्षात ठेवतील, असा इशारा मोहोळ यांनी राष्ट्रवादीला दिला. राज्य सरकारने पालिकेला कोरोना काळात भरीव मदत केली नाही, असा आरोपही महापौरांनी केला आहे.
दरम्यान,आंबील ओढा प्रकरण असो किंवा अन्य काही प्रकरणात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगत असून गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडी या सर्व प्रकारामागे असल्याची कुजबुज आहे. महापौरांचे म्हणणे योग्यच असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पुण्याच्या संबंधीत प्रश्नावर आयोजित केलेल्या बैठकीला महापौरांनाच न बोलावणे हे अनाकलनीय असल्याचे सांगितले जात आहे. पुणेकरांना अजित पवार आणि महापौर मोहोळ या दोघांकडूनही मोठ्या अपेक्षा असून अश्या पद्धतीचे हीन दर्जाचे राजकारण होऊ नये अशीच अपेक्षा पुणेकरांची आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘चिलापी मासे मीच उजनी धरणाच्या जलाशयात सोडले!’; पवारांनी सांगितली आठवण
- ‘वडेट्टीवार बोगस, फंटूस आणि फडतूस माणूस… आता त्यांनी बीडमध्ये येऊन दाखवावं’
- कोणत्याही चौकशीला मी घाबरत नाही असे छातीठोकपणे सांगणारे देशमुख आज पळवाट शोधत आहेत ?
- औरंगाबादेत मनपा आणखी चार पेट्रोल पंप सुरु करणार, मनपा आयुक्तांनी व्यक्त केला निर्धार!
- ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा अधिक धोका – WHO
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
