🕒 1 min read
मुंबई : ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दुसऱ्यांदा समन्स बजावून आज (दि. २९ जून) रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. ईडीकडे असलेले पुरावे आणि इतर माहिती यावरून ईडी आज काय कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून होतं. मात्र, अनिल देशमुख यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास असमर्थता दर्शवली असून त्यांनी ईडीला याबाबत पत्र देखील लिहिलं आहे.
‘आजही मी स्वत: चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय ७२ वर्षे आहे. आजारपण आणि करोना होण्याच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाइन घ्यावा. ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्यास मी कधीही तयार आहे. मात्र, त्याआधी ईडीनं ईसीआर (Enforcement Case Information Report) व प्रश्नांची कॉपी पाठवावी,’ असं देशमुख यांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, आणि देशमुख चौकशीसाठी हजर राहणार नसल्याने विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील देशमुखांना लक्ष्य केलं आहे. ‘आता कोरोना आठवतो? पैसे खाल्ले तेव्हा नव्हता का कोरोना?,’ असा सवालच दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांचे ट्विट –
आता अनिल देशमुखांना कोरोना आठवतो? पैसे खाल्ले तेव्हा नव्हता कोरोना?
ED ने बिलकुल अपवाद करू नये. Law should be same for everyone. उद्या सगळेच म्हणतील आम्ही घरून उत्तर देऊ. मग काय अर्थ यंत्रणेचा? बीजेपी ची ही चाल आहे, पण तुमचे हाथ देखील बरबटलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही— Mrs Anjali Damania (@anjali_damania) June 29, 2021
आता अनिल देशमुखांना कोरोना आठवतो? पैसे खाल्ले तेव्हा नव्हता कोरोना? ED ने बिलकुल अपवाद करू नये. कायदा सर्वांसाठी समानच असायला हवा(Law should be same for everyone). उद्या सगळेच म्हणतील आम्ही घरून उत्तर देऊ. मग काय अर्थ यंत्रणेचा? बीजेपीची ही चाल आहे, पण तुमचे हाथ देखील बरबटलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही,’ असा घणाघात दमानिया यांनी देशमुखांवर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा अधिक धोका – WHO
- आयपीएलमध्ये परदेशी खेळाडू खेळवण्यासाठी बीसीसीआयचे प्रयत्न
- ‘माझं वय ७२ वर्ष, आजही चौकशीला हजर राहू शकत नाही’; अनिल देशमुखांच ईडीला पत्र
- ‘…हे पुणेकर चांगलंच लक्षात ठेवतील’; पुण्याच्या प्रश्नांसंदर्भातील बैठकीत महापौरांनाच डावललं
- ‘…तरच अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहणार’; देशमुखांच्या वकिलाने सांगितली अट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
