औरंगाबाद : शहर विकासाची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मनपाने आपल्या स्तरावर पदभरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी (दि.२८) दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मनपाच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री यांनी संबंधितांना निर्देशित केले.
यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लिमिटेडचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. देसाई यांनी शासनाने मनपाच्या पदभरतीच्या आकृतीबंधास मान्यता दिलेली असून स्वायत्त संस्था असल्यामुळे मनपाला आपल्या स्तरावर पदभरती प्रक्रिया राबवण्याचे अधिकार असल्याचे सांगून त्या माध्यमातून कंत्राटी पध्दती प्रतिनियुक्ती, सेवानिवृत्तधारकांना मुदत वाढ या पध्दतीने तातडीने मनपाने पदभरती करण्याचे निर्देश दिले.
तसेच शहराच्या विकास कामाच्या विविध बाबींचा आढावा घेऊन देसाई यांनी सर्व विकास कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण करुन घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेची सर्व केंद्रे डिसेंबर पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे निर्देशित केले. शहरातील आरोग्य आणि सौंदर्यीकरण या दोन्ही दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया सुरळीत आणि पूर्ण क्षमतेने राबवण्याच्या सूचना दिल्या.
त्याचप्रमाणे मनपा, एमआयडीसी, एमएसआरडीसी या तिन्ही यंत्रणांनी आपल्या अखत्यारीतील रस्त्यांची कामे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विहीत मुदतीत पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच कोविड लसीकरण प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण करुन लवकरात लवकर सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने यंत्रणेला सूचना केल्या.
मनपाने कंत्राटी पध्दतीने भरती केलेल्या ४४ जणांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात यावेळी अनिल दिवेकर, दिपक बनसोडे, प्रफल्ल दाभाडे, सारीका भालेराव, संदीप कसारे, संजेय लहेरा, मंगेश कजबे, ज्ञानेश्वर दणके, सुधीर दाभाडे, आणि मिना कातुरे या १० जणांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. आयुक्त पांडेय यांनी शहराच्या विविध विकास कामाच्या प्रगतीबाबत माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबमध्ये ‘आप’ जिंकल्यास नागरिकांना मोफत वीज देणार; केजरीवालांची घोषणा
- वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या भाजप खा.साक्षी महाराजांची फसवणूक
- अॅथलेटिक्स ट्रॅकवर नेत्यांच्या गाड्या, पवारांच्या प्रकृतीच्या कारणाचा केदारांनी केला ढालीसारखा वापर
- ‘दलितांच्या मतांवर आरपीयचाही हक्क’ ; उत्तरप्रदेशात भाजपकडे केली ‘इतक्या’ जागांची मागणी
- पंजाबमध्ये ‘आप’ जिंकल्यास नागरिकांना मोफत वीज देणार; केजरीवालांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
