Share

अनिल देशमुखांमुळे झाले राष्ट्रवादीचे प्रचंड नुकसान, पक्षावर आली बॅकफुटवर खेळण्याची वेळ

Published On: 

🕒 1 min read

 पुणे – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरुन डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये मुंबईच्या काही पब्स, बारच्या मालकांकडून चार कोटीहून अधिक वसुली केल्याचा आरोप देखील आता होऊ लागला आहे. यात अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवरही ED ने  नुकत्याच धाडी टाकल्या.या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण विधानसभा अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर घडलेल्या घडामोडींमधून अँटिलिया स्फोटक प्रकरणाचे धागेदोरे सुरुवातीला मुंबई पोलिसांतील गुन्हे शाखेतील अधिकारी सचिन वाझे, पुढे तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि नंतर खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले. अखेरीस वाझे यांचं निलंबन-अटक, सिंह यांची बदली आणि देशमुख यांच्या राजीनामा या एकापाठोपाठ एक घडत असलेल्या घडामोडींमुळे हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे.

दरम्यान, हे सर्व प्रकरण समोर येण्याआधी राष्ट्रवादी राज्यात फ्रंटफुट वर खेळत होती मात्र या प्रकरणामुळे आता पक्षाला बॅकफुटवर खेळावे लागत आहे.देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर होते यामुळेच त्यांच्या प्रतिमेपेक्षा पक्षाच्या प्रतिमेला सुद्धा धक्का पोहचला. सध्या विरोधकांना राष्ट्रवादीचे प्रवक्ते तसेच महाविकास आघाडीतील नेते चोख प्रत्युत्तर देण्याचे प्रयत्न करत आहेत मात्र फाटलेल्या आभाळा ठिगळे लावण्याचा प्रयत्न ते करत असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही. अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह अनेक छोट्या-मोठ्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यावेळी सुद्धा पक्षाच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम झाला होता मात्र आता पक्ष आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असताना हा आघात झाल्याने राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले आहे. आरोप खरे की खोटे हे तर चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रियेतून पुढे येईलच मात्र त्यासाठी बराच काळ जाऊ द्यावा लागेल.

राष्ट्रवादीमध्ये अनेक धुरंधर नेते असताना पक्षाने विश्वासाने त्यांच्याकडे गृहखाते दिले होते मात्र आता त्यांना खाते दिल्याचा पक्षश्रेष्ठींना होत असेल असेही सांगतले जाते आहे. याशिवाय विरोधकांना देखील एक चांगला मुद्दा या निमित्ताने मिळाला असून याचा वापर ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन करण्यासाठी नक्की करतील याबद्दल कोणालाही शंका असू शकत नाही. विदर्भात अनिल देशमुख यांच्यामुळे पक्षाचा विस्तार करणे राष्ट्रवादीला सोपे गेले असते मात्र आता त्यांना या सर्व प्रक्रियेपासून दूरच ठेवावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!