मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात आली असताना महाराष्ट्रात अनलॉकला सुरुवात झाली होती. परंतु, महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर डेल्टा प्लस या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरीएंटने डोकं वर काढल्याने राज्य सरकारतर्फे नवे निर्बंध लागू करण्यात येत आहे.
त्यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे. त्यामुळे सोमवारपासून नवी मुंबईत नवीन निर्बंध लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोव्हिड डेल्टा प्लस व्हेरीएंट व तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक स्तरावरही निर्बंध बदलण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आदेश जारी करण्यात आले आहेत. सोमवार 28 जूनपासून शहरात सदर आदेश लागू राहतील.
नवी मुंबईसाठी नवी नियमावली :
- सर्व प्रकारच्या खासगी अस्थापनांसह दुकाने, हॉटेल सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.
- अत्यावश्यक सेवा, कृषी विषयक सेवा दुकाने संपूर्ण आठवडाभर सुरू राहतील, तर उर्वरीत सर्व दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद असतील.
- सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभासाठी केवळ 50 लोकांच्या उपस्थितीला मंजूरी असेल.
- शाळा महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यास मनाई करण्यात आली आहे.
- रेस्टॉरंट, उपहारगृह सोमवार ते शुक्रवारदरम्यान, सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 50% डायनिंग क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल.
- शॉपिंग मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, सिंगल स्क्रीन मल्टिप्लेक्स पूर्णपणे बंद असतील.
- खासगी/शासकीय कार्यालये 50 टक्के उपस्थितीसह सुरु ठेवता येईल.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात आज कोरोनामुक्तांपेक्षा नव्या कोरोना रुग्णांची संख्या अधिक
- ‘..मग पाहिजे तर मन की बात पण सांगा’, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
- ‘स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने लसीकरणाला गती द्या’, मोदींनी घेतला आढावा
- ‘तो वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’; विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- ‘सत्तेचा माज किती असू शकतो त्याचे हे जिवंत उदाहरण’; भातखळकरांचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
