🕒 1 min read
औरंगाबाद : जनशताब्दी एक्स्प्रेसचा विस्तार हिंगोलीपर्यंत होणार आहे. मात्र यामुळे औरंगाबादकरांच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. यात शहरामधील प्रवाशांना जागा मिळणे अवघड होईल. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी यासाठी आवाज उठवणे गरजेचे आहे. मात्र औरंगाबाद करांच्या समस्यांवर बोलायला कोणीही नसल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने इतर विभागांना फायदा होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने जनशताब्दी एक्स्प्रेस जालना ते सीएसटी मुंबईपर्यंत सुरू केली हाेती. मात्र, आता या रेल्वेचा विस्तार हिंगोलीपर्यंत करण्याचे संकेत रेल्वे विभागाने दिले आहेत. औरंगाबादकरांसाठी सुरू केलेली ही रेल्वे प्रथम जालना आणि आता हिंगोलीपर्यंत गेली तर शहरवासीयांच्या अडचणीत माेठी वाढ होणार आहे. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी आवाज न उठवण्याच्या भूमिकेमुळे नागरिकांच्या झोळीत काहीच पडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय रेल्वेच्या वेळापत्रक समितीने जनशताब्दीसह बंगळुरू-नांदेड रेल्वेचा विस्तार करण्याची शिफारस केली आहे. मुंबईला जाण्यासाठी मराठवाड्यासाठी जनशताब्दी महत्त्वाची रेल्वे आहे. सकाळी ६ वाजता औरंगाबादहून निघालेली गाडी दुपारी १२.३० वाजता मुंबईत पाेहोचते. मराठवाड्यासाठी सुरू झालेल्या नंदीग्राम व देवगिरी एक्स्प्रेसचा विस्तार अनुक्रमे नागपूर व सिकंदराबादपर्यंत झाल्यानंतर मोठ्या प्रयत्नाने जनशताब्दी सुरू झाली.
राज्य राणी एक्स्प्रेस पूर्वी मुंबई ते मनमाडदरम्यान धावत होती. तिचा विस्तार वर्षभरापूर्वी नांदेडपर्यंत करण्यात आला. परंतु, पाच डबे नांदेडहून जाताना मनमाडसाठी राखीव ठेवण्यात आले. राज्य राणीमध्ये स्लीपर व बसून जाण्याची सोय आहे. जनशताब्दीत केवळ बैठक आसन व्यवस्था असून हिंगोलीपर्यंत विस्तार केल्यामुळे यात स्लीपर म्हणजेच झोपून जाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असून मुंबईकडे जाताना औरंगाबादहून काही डबे राखीव ठेवण्याची मागणी केली जात आहे. अकोला लोकमान्य टिळक टर्मिनस ही प्रस्तावित साप्ताहिक रेल्वे नियमित केली तर यातून औरंगाबादकरांची समस्या सुटेल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘रोल मॉडेल‘ म्हणून पुढे येताना तरुणांनी आचरण उत्तम ठेवावे; राज्यपाल कोश्यारींचे आवाहन
- सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर ; सोमवारपासून नागपुरात नवे निर्बंध
- ‘राऊत चावी फिरविली तेवढेच सांगतात, नंतर भलतेच बोलतात’, रावसाहेब दानवेंचा टोला
- ‘मराठवाड्याला लवकरात लवकर पाणी उपलब्ध करणार’, जयंत पाटलांचे आश्वासन
- ‘ओबीसींच्या नेतृत्वाला संपवण्याचे काम भाजपने केले तेच आज ओबीसींच्या बाजुने गळा काढत आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
