🕒 1 min read
नागपूर : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात आली असताना महाराष्ट्रात अनलॉकला सुरुवात झाली होती. परंतु, महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर डेल्टा प्लस या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरीएंटने डोकं वर काढल्याने राज्य सरकारतर्फे नवे निर्बंध लागू करण्यात येत आहे.
त्यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे. त्यामुळे सोमवारपासून नागपुरात नवीन निर्बंध लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोमवारपासून नागरपुरात सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार, मॉल्स मात्र बंद राहणार आहेत.
कोव्हिड डेल्टा प्लस व्हेरीएंट व तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक स्तरावरही निर्बंध बदलण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे आदेश जारी करण्यात आले आहेत. सोमवार 28 जूनपासून शहरात सदर आदेश लागू राहतील.
नागपूरकरांसाठी नवी नियमावली :
- सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार
- मॉल्स बंद
- हॉटेल आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार
- लग्नकार्य 50% क्षमतेने किंवा पन्नास लोकांमध्येच करता येणार
- जिम, सलून, स्पा दुपारी चार वाजेपर्यंत खुले राहणार
- अंतयात्रेला केवळ 20 लोकांना परवानगी असणार
- स्विमिंग पूल बंद असणार
— Nagpur Municipal Corporation (@ngpnmc) June 26, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘मराठवाड्याला लवकरात लवकर पाणी उपलब्ध करणार’, जयंत पाटलांचे आश्वासन
- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे दुरावा झाला कमी, नेत्यांच्या एकजुटीचा पक्षाला होणार फायदा ?
- पुण्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू ; आता दुकाने राहणार केवळ ‘याच’ वेळेपर्यंतच सुरु
- अनुष्का शर्माच्या नव्या लुकने अनेकांचे वेधले लक्ष; पहा फोटो
- औरंगाबाद मनपाचा दणका! ‘याठिकाणी’ नालेसफाईवर झालेला खर्च व्यावसायिकांकडून वसूल करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
