Share

‘मराठवाड्याला लवकरात लवकर पाणी उपलब्ध करणार’, जयंत पाटलांचे आश्वासन

Published On: 

लातूर: राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सध्या मारठवड्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा या अंतर्गत ते सध्या मराठवाड्यात आहेत. लातूर येथे झालेल्या आढावा जलसंपदा विभागाच्या आढावा बैठाइत ते बोलत होते. मारठवड्याला लवकरात लवकर पानी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्याच सोबत इतर मुद्यांवरही त्यांनी संवाद साधला.

मराठवाड्याला लवकरात लवकर पाणी उपलब्ध करणे हे शासनाचे धोरण आहे. पावसाचे पाणी गुजरात व समुद्रात वाहून जाते, हे पाणी वळण बंधाऱ्यांमार्फत माजलगाव धरणात आणून येथून उस्मानाबाद, बीड व लातूर जिल्ह्याला कसं देता येईल याबाबत जलसंपदा विभागास आराखडा सादर करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच उजनी धरणाचे पाणी धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात आणता येईल का याबाबत अमित देशमुख व जलनीती मधील तज्ञ यांच्या समवेत मुंबई येथे स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मागे लातूरला मिरज येथून ट्रेनने पाणी आणाले होते. अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. शासन मराठवाड्याची दुष्काळग्रस्त ओळख मिटवण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील राहील आणि मराठवाड्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करुत तसेच मांजरा व निम्न तेरणा प्रकल्प अंतर्गत अंतिम टप्प्यात असलेल्या सर्व कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही यावेळी त्यांनी आश्वासन दिले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!