🕒 1 min read
औरंगाबाद : तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणार्या भारतात विद्यार्थी, संशोधकांकडून खूप अपेक्षा आहेत. समाजाचे ‘रोल मॉडेल‘ म्हणून पुढे येत असतांना तरुणांनी आचरण उत्तम ठेवावे, असे आवाहन कुलपती तथा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. वैद्यकीय व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण मातृभाषेतून देण्याचा निर्णय देशाच्या प्रगतीसाठी क्रांतीकारक ठरणार आहे, असा ठाम विश्वास ’एआयसीटीई’चे अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे यांनी शुक्रवारी (दि. २५) व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच दीक्षांत समारंभ ऑनलाइन पध्दतीने शुक्रवारी पार पडला आहे. कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे हे यंदाचे दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे होते.
महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ सहस्त्रबुध्दे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे विद्यार्थी केंद्रीत आहे. तसेच देशाच्या शैक्षणिक पाया बळकट करणारे आहे, असे डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी स्पष्ट केले आहे. मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू व बंगाली या पाच भाषांमधून १४ तंत्रशिक्षण संस्थेत व्यावसायिक शिक्षण यंदापासून सुरु होत असल्याचे यावेळी डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी घोषित केले.
या समारंभात ४२२ संशोधकांना पीएचडी प्रदान करण्यात आली. यामध्ये कला व सामाजिकशास्त्रे १७४, विज्ञान व तंत्रज्ञान १२७, वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र ५८ तसेच आंतरविद्या शाखेच्या ६३ संशोधकांचा समावेश आहे. या कार्यक्रमात एकुण ८१ हजार ७३६ पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात आले. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान ३८ हजार ५४१ मानव्यविद्या, २० हजार ३८२ वाणिज्य शास्त्र, १७ हजार ५९३, आंतर विद्या शाखेच्या ४ हजार २१० जणांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे दुरावा झाला कमी, नेत्यांच्या एकजुटीचा पक्षाला होणार फायदा ?
- पुण्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू ; आता दुकाने राहणार केवळ ‘याच’ वेळेपर्यंतच सुरु
- अनुष्का शर्माच्या नव्या लुकने अनेकांचे वेधले लक्ष; पहा फोटो
- औरंगाबाद मनपाचा दणका! ‘याठिकाणी’ नालेसफाईवर झालेला खर्च व्यावसायिकांकडून वसूल करणार
- मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा पीकविमा तत्काळ द्या, जि.प. सदस्य रमेश गायकवाड यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
