Share

…म्हणून ‘बाबा का ढाबा’च्या मालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न

Published On: 

नवी दिल्ली : ‘बाबा का ढाबा’ याची चांगलीच चर्चा मागील वर्षी झाली होती. लॉकडाउनमुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. याचा आर्थिक फटका ‘बाबा का ढाबा’ चे ८० वर्षीय मालक कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नी बदामी देवी यांना बसला  याकाळात युट्यूबवर गौरव वासन याने यांचा एक व्हिडीओ शूट केला होता, ते पाहून लोकांनी मदतीचा हात पुढे केला होता.

दरम्यान, बाबा का ढाबा चालवणारे कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कांता प्रसाद यांनी मद्यप्राशन करून झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कांता प्रसाद यांना उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. आता त्यांची प्रकृती ठीक असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते घरी परतले आहेत.

पोलीस उपायुक्त अतुल ठाकूर यांनी सांगितलं की, गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते घरी परतले असून आराम करीत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,अनेक जणं फोन करून यूट्यूबर गौरव वासन याची माफी मागण्यासाठी जबरदस्ती करीत आहेत. यामुळे ते वैतागले होते. आणि हे धक्कादायक पाऊल उचललं. तरी या प्रकरणात कोणताही गुन्हा नोंदविण्यात आला नाही. यावर वासन म्हणाला की, कोण त्यांना फोन करून त्रास देत आहे, याबद्दल मला माहिती नाही. जेव्हा त्यांनी माध्यमांद्वारे माझी माफी मागितली त्यानंतर मी त्यांची भेट घेतली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!