🕒 1 min read
मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री पायल रोहतोगी ही नेमही तिच्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असते. काही दिवसापुर्वी सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या मुलांना हातपाय मोडण्याची धमकी दिल्यामुळे तिला अहमदाबाद पोलिसांनी तिला अटक केली होती. या प्रकरणावर पायल रोहतगीचा मित्र संग्राम सिंग याने एक मोठा खुलासा केला आहे.
संग्राम सिंग हा एक प्रसिद्ध अॅथलिट आहे. तसेच तो पायल रोहतगीचा चांगला मित्र आहे. पायलच्या अटकेची माहिती मिळताच तो अहमदाबादमध्ये पोहोचला. यानंतर त्याने ट्विट करत तिच्यावर झालेले आरोप हे साफ खोटे असल्याचा दावा केला आहे. त्याने त्याचे मत ट्विट करत मांडले आहे. या ट्विटमध्ये तो म्हणाला की, ‘पायलच्या विरोधात जी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ती चुकिची आहे. सोसायटीचे चेअरमेन आणि सदस्यांनी तिला धमकावले आहे. खऱ्याला अडचणीचा सामना करावा लागु शकतो मात्र पराभुत करता येणार नाही.’
Namaste all. I always speak right thing. This is false case against #PayalRohatgi. Chairman & few committee members threatened her publicly. Please check video on her instagram & youtube on Ajm meeting video. She is out & safe. Truth can face problems but can't defeated. God bles
— SANGRAM U SINGH (@Sangram_Sanjeet) June 25, 2021
यानंतर त्याने तिच्याबद्दल चुकिची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात त्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच तो म्हणाला की अधीक माहितीसाठी तीच्या इन्स्टाग्रामवर पायलने पोस्ट केलेल्या व्हिडीओ एकदा बघुन तपासणे गरजेचे असल्याचे म्हणाला. यापुर्वी पायलला राजस्थान पोलिसांनी अटक केली होती. पायलने काही दिवसापुर्वी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर वादग्रस्त व्हिडीओ बनवल्यामुळे तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
- पासपोर्ट नूतनीकरणप्रकरणी उच्च न्यायालयाचा कंगनाला दिलासा देण्यास नकार
- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू तीन आठवडे सुट्टीवर ; माजी कर्णधार भडकला, म्हणला…
- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू तीन आठवडे सुट्टीवर ; माजी कर्णधार भडकला, म्हणला…
- राज्यात आज १०,१३८ रुग्ण कोरोनामुक्त तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- कौतुकास्पद! औरंगाबादकरांची ‘माझी स्मार्ट बस’ देशात पहिली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
